Tarun Bharat

‘स्पुतनिक लाइट’ उतरणार मैदानात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला लवकरच आणखी एक लस उपलब्ध होणार आहे. पनेसिया बायोटेक भारतात उत्पादित करत असलेली ‘स्पुतनिक लाइट’ ही सिंगल डोस लस सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. या लसीची किंमत 750 रुपये असू शकते. पनेसिया बायोटकने नुकतीच औषध नियामकाकडे या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

पनेसिया बायोटेकने जुलैमध्ये स्पुतनिक लसीच्या उत्पादनाची परवानगी मिळाल्याची घोषणा केली होती. हिमाचल प्रदेशच्या बद्दी येथील प्लांटमध्ये ही लस बनविण्यात आली असून, सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ही लस प्रभावी ठरली आहे. सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीनेही या लसीला हिरवा कंदील दाखवला असून, पनेसिया दरवर्षी दहा कोटी डोसचे उत्पादन करणार आहे.

पनेसिया उत्पादित करणाऱ्या या रशियन लसीचे वितरण हैदराबादेतील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी करणार आहे. सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडून भारतात दोन डोसच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे वितरण सुरू आहे.

Related Stories

‘तुम्ही फक्त नुपूर शर्माचे पंतप्रधान नाही आहात’: औवेसी

Abhijeet Khandekar

ट्रेलर-बस धडकेत 12 जणांचा होरपळून मृत्यू

Patil_p

…कायदेशीरदृष्टय़ा शक्य नाही!

Amit Kulkarni

चार वर्षाचा मुलगा पडला बोअरवेलमध्ये

Patil_p

लष्कर-ए-तैयबाच्या चार संशयित दहशतवाद्यांना श्रीनगरमध्ये अटक

Abhijeet Khandekar

ओडिशामध्ये वायूगळती, 4 मजुरांनी गमावला जीव

Omkar B
error: Content is protected !!