Tarun Bharat

‘स्पुतनिक-व्ही’चा 20 दिवसांपासून तुटवडा

प्रतिनिधी / सातारा : 

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या 20 दिवसांपासून लसीचा पहिला डोस उपलब्ध झालेला नाही. कंपनीत उत्पादन नसल्याने पहिला डोस आला नसल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.    

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिननंतर रशियाची स्पुतनिक-व्ही ही लस नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र गेल्या 20 दिवसापासून ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीत पहिल्या डोसचे उत्पादन करण्यात आलेले नाही. यामुळे  या लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक-व्ही ची लस मिळत आहे. या लसीची किंमत 1 हजार 145 रूपये इतकी आहे. आतापर्यंत 2 हजार 392 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 1 हजार 276 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांनाच दुसरा डोस देण्यात येत आहे. स्पुतनिक लसीचा पहिला डोस ज्या नागरिकांना घ्यायचा आहे. त्यांना तुटवडा निर्माण झाल्याने डोस देता येत नसल्याची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.

Related Stories

सातारा : कोरोनाचा तेरावा आठवडा जास्त दाहक : जिल्ह्यात भयकंप

Archana Banage

‘इन्स्पायर अवॉर्ड’ नामांकनात सातारा प्रथम

Archana Banage

सातारा : तापोळा बामणोली विभाग मोबाईल रेंज विना वारंवार होतोय संपर्कहीन

Archana Banage

ऑगस्ट अखेरीस वाढ मंदावत असल्याचा दिलासा

datta jadhav

स्वच्छ सर्वेक्षणनंतर माझी वसुंधरा अभियानात कराडचा डंका

Patil_p

कोरगावच्या वाघ्या घेवडय़ाच्या ख्याती पोस्टाच्या पाकिटावर

Patil_p