Tarun Bharat

स्पेनचा टेनिसपटू पेरेझवर आठ वर्षांची बंदी

Advertisements

वृत्तसंस्था/ माद्रिद

स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिसपटू एन्रिक लोपेझ पेरेझ हा मॅचफिक्सिंग प्रकरणात दोषी ठरल्याने त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. 2017 च्या कालावधीत तीन स्वतंत्र प्रकरणांमध्ये त्याचा मॅचफिक्सिंग करण्यात सहभाग होता, असे टेनिस इंटीग्रेटी युनिटने सांगितले.

स्पेनचा 29 वर्षीय टेनिसपटू पेरेझने 2018 साली एटीपीच्या मानांकन यादीत सर्वोत्तम म्हणजे 154 वे स्थान मिळविले होते तर गेल्या वर्षी एटीपीच्या दुहेरीच्या मानांकनात तो 135 व्या स्थानावर होता. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने टेनिसपटू पेरेझला 25 हजार डॉलर्सचा दंड केला आहे. पेरेझच्या प्रकरणाची सुनावणी भ्रष्टचार विरोधी पथकाचे प्रमुख रिचर्ड मॅक्लारेन यांच्यासमोर झाली होती. पेरेझकडून टेनिसच्या शिस्तपालन नियमाचे उल्लंघन झाल्याने त्याच्यावर आठ वर्षांची बंदी आणि रोख रकमेचा दंड करण्यात आला. 2019 च्या डिसेंबर महिन्यात पेरेझवर हंगामी स्वरुपाची बंदी घालण्यात आली होती. आता त्याला पुढील आठ वर्षांच्या कालावधीत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

Related Stories

विजेत्या टेबल टेनिसपटूंना आता समान बक्षीस रक्क्म

Patil_p

एथिक्स आयोग’ बरखास्तीचा निर्णय अयोग्य : राजीव मेहता

Patil_p

गॉफ, टिचमन उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

न्यूझीलंडचा पाकवर डावाने विजय

Omkar B

ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकतर्फी विजय

Patil_p

संतप्त बेदींचा डीडीसीए सदस्यत्वाचा राजीनामा

Omkar B
error: Content is protected !!