Tarun Bharat

स्पेनचा दणदणीत विजय, स्वीडनची पोलंडवर मात

वृत्तसंस्था/ सेव्हिले

युरो चषक 2020 फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात स्पेनने गट ई मधील शेवटच्या साखळी सामन्यात स्लोव्हाकियाचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले. अन्य एका सामन्यात स्वीडनने पोलंडचा 3-2 असा निसटता पराभव केला.

स्पेनतर्फे आयमेरिक लॅपोर्ट, पाब्लो साराबिया, फेरान टोरेस यांनी गोल नोंदवले तर मार्टिन डुब्रावका व जुराज कुका यांनी स्वयंगोल करून स्पेनला बोनस गोल बहाल केले. स्पेनने 5 गुणांसह गटात दुसरे स्थान मिळविले असून शेवटच्या सोळा फेरीत त्यांची लढत क्रोएशियाविरुद्ध कोपनहेगन येथे होणार आहे. सेंट पीटर्सबर्ग झालेल्या याच गटातील दुसऱया सामन्यात स्वीडनने पोलंडवर 3-2 अशी निसटती मात करीत गटात पहिले स्थान मिळविले. स्वीडनतर्फे एमिल फोर्सबर्गने दोन व व्हिक्टर क्लासेनने एक गोल नोंदवला तर पोलंडचे दोन्ही गोल रॉबर्ट लेवान्डोवस्कीने केले.

Related Stories

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात

Patil_p

फॉर्ममधील मुंबईचा आज बांबोळीत ओडिशाशी सामना

Patil_p

टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी

Patil_p

कसोटी गोलंदाजांत बुमराहची चौथ्या स्थानी झेप

Patil_p

रोहितला टी-20 कर्णधार केले नाही तर भारतीय क्रिकेटचे नुकसान

Patil_p

हरभजन सिंग, जावगल श्रीनाथ यांना एमसीसीचे आजीवन सदस्यत्व

Patil_p