Tarun Bharat

स्पेनचा बुस्टा विजेता

वृत्तसंस्था/ मार्बेला

रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील ऍनडेलुसिया खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या टॉप सीडेड पाब्लो कॅरेनो बुस्टाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. बुस्टाच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील एटीपी टूरवरील हे पाचवे विजेतेपद आहे.

 स्पेनमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात टॉप सीडेड बुस्टाने स्पेनच्या मुनेरचा 6-1, 2-6, 6-4 असा पराभव केला. मायदेशातील स्पर्धेतील बुस्टाचे हे पहिले विजेतेपद आहे. अलिकडे बुस्टाला स्वीडनचा माजी टेनिसपटू बियॉर्न बोर्गचे मार्गदर्शन लाभत आहे. बुस्टाच्या जेतेपदाच्या कामगिरीचे बोर्गने कौतुक केले आहे.

Related Stories

माझ्यात फारसे क्रिकेट राहिलेले नाही!

Omkar B

भारतीय रोईंग संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

रवी शास्त्री म्हणतात, निवड समितीने रोहित शर्माला ‘या’ कारणासाठी वगळले!

Patil_p

ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची दमदार सुरुवात

Patil_p

लाल मातीचं ऑस्कर

datta jadhav

पंजाब उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Patil_p