Tarun Bharat

स्पोर्टिंग प्लॅनेट संघाकडे फँको चषक

Advertisements

17 वर्षाखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा

बेळगाव : मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फौंडेशन आयोजित फँको ग्रासरूट फुटबॉल चषक 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात स्पोर्टिंग प्लॅनेट संघाने मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघावर 1-0 असा निसटता विजय मिळवून फँको चषक पटकाविला.

बालिका आदर्श येथील बिटा ग्रासरूट टर्फ मैदानावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, हुबळी, हल्याळ, बेळगाव येथील संघांनी भाग घेतला होता. 120 मुलींनी या स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघाने हल्याळ फुटबॉल क्लब संघाचा 3-0 तर दुसऱया उपांत्य फेरीत स्पोर्टिंग प्लॅनेट संघाने कोल्हापूर फुटबॉल संघाचा सडनडेथवर पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात स्पोर्टिंग प्लॅनेट संघाने मानस स्पोर्ट्स संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. धनश्री कदमने 27 व्या मिनिटाला विजयी गोल नोंदविला. प्रमुख पाहुणे सलिम फनिबंद, संतोष हतनुरी, समिर किल्लेदार यांच्या हस्ते विजेत्या स्पोर्टिंग प्लॅनेट, उपविजेत्या मानस स्पोर्ट्स फौंडेशन संघांना चषक, सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू धनश्री कदम तर सर्वाधिक गोल नोंदवणारी सुमेधा पाटील यांना चषक देऊन खास गौरविण्यात आले.

Related Stories

जोकोविचला पराभवाचा धक्का

Patil_p

शेली प्रेजरची जलद वेळ

Patil_p

यापुढे प्रत्येक मालिकेत सर्वोत्तम संघ नसेल – बटलर

Patil_p

डोपिंगमध्ये दोषी ठरलेली ऍथलीट अनिता निलंबित

Patil_p

दक्षिण आफ्रिकेच्या मोकोकाचा नवा विश्वविक्रम

Patil_p

गुजरातचे पदकविजेते होणार मालामाल!

Patil_p
error: Content is protected !!