Tarun Bharat

स्मरणशक्ती वाढविणारे हेल्मेट

Advertisements

6 मिनिटे वापरल्यावर दिसणार प्रभाव

स्मरणशक्ती कशी वाढवावी, मेंदू कशाप्रकारे तल्लख करावा अशा प्रश्नांची उत्तरे विस्मृतीच्या समस्येला तेंड देणारे लोक गुगलवर शोधत असतात. अशा लोकांसाठी वैज्ञानिकांनी स्मरणशक्ती वाढविणारे हेल्मेट तयार केले आहे.

डरहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांकडून विकसित हे हेल्मेट (ब्रेन झॅप्पिंग हेल्मेट) डिमेंशियाच्या (विस्मृतीचा आजार) उपचारात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वाढत्या वयासह स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते असे दिसून आले आहे. लोक दिनक्रमापासून जीवनातील जुन्या आणि विशेष गोष्टीही विसरू लागतात. अशा स्थितीत वैज्ञानिकांकडून तयार करण्यात आलेले हे गॅझेट त्यांना उपयुक्त ठरू शकते.

पेशींना नीट करणार

हेल्मेट घातल्यावर स्मरणशक्तीला नियंत्रित करणाऱया मेंदूच्या डॅमेज्ड पेशींना पुन्हा नीट करता येईल. महणजे या ‘ब्रेन झॅप्पिंग हेल्मेट’च्या वापराने मेंदूच्या पेशींची काम करण्याची क्षमता चांगली करता येईल, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारणार असल्याचे हे हेल्मेट तयार करणाऱया वैज्ञानिकांच्या पथकाचे सदस्य डॉक्टर गॉडल डूगल यांनी म्हटले आहे.

केवळ 6 मिनिटे…

हे हेल्मेट केवळ 6 मिनिटे घालावे लागणार आहे, ज्यानंतर संबंधिताला फरक जाणवणार असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. डॉ. डूगल यांच्यानुसार हेल्मेटमधून निघणारी इन्फ्रारेड किरणे मेंदूच्या अंतर्गत हिस्स्यांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे मेंदूच्या डॅमेज्ड पेशी बऱया होऊ लागतात. असे घडताच स्मरणशक्तीत सुधारणा होऊ लागते आणि हेल्मेट रक्ताचा प्रवाह देखील सुधारण्यास मदत करते.

इतकी असणार किंमत

स्मरणशकत सुधारणाऱया या हेल्मेटवरून 13 जणांवर संशोधन करण्यात आले आहे. यात हेल्मेटचा मेंदूवर सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे आढळून आले. तज्ञांनुसार मेंदूतील पेशी वेगाने डॅमेज्ड होऊ लागल्यावर डिमेंशिया होतो. सुमारे 7.5 लाख रुपयांचे हे हेल्मेट या आजाराच्या उपचारात गेमचेंजर ठरू शकते. पण अद्याप हे बाजारात उपलब्ध नाही.

Related Stories

जादुई आहेत 11 वर्षीय मुलीचे केस

Amit Kulkarni

गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर

Tousif Mujawar

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

Patil_p

बेटावर केवळ अब्जाधीशांचे वास्तव्य

Patil_p

दरवर्षी 65 कोटींचे उत्पन्न मिळवून देणारी ‘मछली’

Amit Kulkarni

राधानगरी अभयारण्यात ब्लॅक पँथरही? अर्धवट काळा बिबटय़ा कॅमेऱयात कैद

Archana Banage
error: Content is protected !!