Tarun Bharat

स्मशानभूमीतील जुन्या इमारतीची स्वच्छता

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांचा बळी गेला आहे. मात्र, या कोरोना  मृतदेहांवर  शनिवार रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसाने  अंत्यसंस्कार करणे कठीण झाले होते. त्यामुळे सदाशिवनगर स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन काही समाजसेवकांनी येथील जुनी इमारत स्वच्छ करून त्या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

रविवारी 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास जागा अपुरी पडत असल्याचे लक्षात येताच येथील स्मशानभूमीतील जुनी इमारत स्वच्छ करण्यात आली. शनिवार रात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे मृतदेहांवर अंत्यविधी  करण्यास व्यत्यय येत होता. यावेळी समाज सेवक सुरेंद्र अनगोळकर, शंकर पाटील, अभिजित चव्हाण, विनायक पवार, ओमकार बिडकर, शिवम हुलजी, प्रथमेश बिडीकर यांनी महापालिकेचा कर्मचाऱयांची परवानगी घेऊन सदाशिवनगर स्मशानभूमीतील जुनी इमारत स्वच्छ करून कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केले.

Related Stories

खडेबाजार पोलीस स्थानकासमोर दिवसाही उजेड पाडला

Amit Kulkarni

हेल्मेट सक्तीची कार्यवाही सुरू

Patil_p

अशोक नायगावकर यांचा सत्कार

Amit Kulkarni

निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम उत्सहात

Amit Kulkarni

रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत कोरोना रुग्णाचा रस्त्यावरच मृत्यू ; आयुक्तांनी रूग्णाच्या कुटूंबियांची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी

Archana Banage

जे सुंदर ते अधिक सुंदर करण्याची किमया चित्रकार करतो!

Amit Kulkarni
error: Content is protected !!