Tarun Bharat

स्मार्टफोन बाजार 50 टक्क्मयांनी घटला, शाओमी, विवो मात्र अव्वल

Advertisements

नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या घटनांमुळे स्मार्टफोन विक्री मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. देशव्यापी लॉकडाऊनने तर स्मार्टफोनचा बाजार निम्म्यावर आणला आहे. परंतु ही स्थिती असली तरी दुसऱया बाजूला मात्र चायना ब्रँड विवो आणि शाओमी स्मार्टफोन बाजाराच्या हिस्सेदारीमध्ये अव्वल स्थानी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. वित्त वर्ष 2020 च्या दुसऱया तिमाहीत स्मार्टफोन शिपमेंट 48 टक्क्मयांनी घटून 17.3 दशलक्ष युनिट्वर राहिली असल्याची माहिती मार्केट ऍनालिस्ट रिसर्च फर्म कॅनालिस यांनी दिली आहे. तर पहिल्या तिमाहीत हा आकडा 12 टक्क्मयांनी वाढून 33.5 दशलक्ष युनिट्वर राहिला आहे. उपलब्ध अहवालानुसार लॉकडाऊनच्या दरम्यान स्मार्टफोन कंपन्या व विपेत्यांना मोठय़ा प्रमाणात अडचणांचा सामना करावा लागला असल्याचे सदर अहवालात म्हटले आहे. याच दरम्यान एका बाजूला उत्पादनात झालेली घट, दुसऱया बाजूला ऑनलाइन आणि ऑफलाईन रिटेलर्स यांनाही फोन विक्रीस मनाई करण्यात आली होती यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. स्मार्टफोन बाजार घटून निम्म्यावर आला असला तरीही चिनी ब्रँड शाओमी सर्वोच्च स्थानावर राहिला आहे.

Related Stories

स्टार्टअप मीशोला ग्राहकांचा दमदार प्रतिसाद

Patil_p

शेअर बाजारात वर्षाची सुरूवात उसळीने

Patil_p

बिर्ला फॅशनकडून ‘सब्यसाची’त हिस्सेदारी

Amit Kulkarni

निस्सान मोटरच्या विक्रीत45 टक्क्यांची वाढ

Patil_p

अदानी पोर्टस्चा नफा 285 टक्के वाढला

Patil_p

साखर उत्पादनात वाढीचा टक्का कायम

Patil_p
error: Content is protected !!