Tarun Bharat

स्मार्टवॉचमध्ये ‘सॅमसंग’च नंबर वन

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या अहवालात माहिती

नवी दिल्ली

 स्मार्टवॉचच्या स्पर्धेत सॅमसंगने इतर कंपन्यांना मागे टाकले आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनने केलेल्या पाहणीत सॅमसंग कंपनीचे स्मार्टवॉच सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. जून 2021 च्या तिसऱया तिमाहीत सॅमसंगने स्मार्टवॉचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. वर्षाच्या स्तरावर स्मार्टवॉचच्या शिपमेंटमध्ये 860 टक्के इतकी वाढ झाली आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत सॅमसंगने बाजारात 41 टक्के वाटय़ासह अव्वल स्थान काबीज केले आहे.

वॉच 2 ऍक्टिव्ह व वॉच 3 सिरीज लोकप्रिय

या स्मार्टवॉचच्या स्पर्धेत सॅमसंग निर्विवाद जेता ठरला आहे. गॅलक्सी वॉच ऍक्टिव्ह 2 व वॉच 3 सिरीज या स्मार्टवॉचने भारतीयांचे मन जिंकले आहे. वेअर ओएस युक्त ऍपल वॉच व फॉसील वॉचप्रमाणेच सॅमसंगचे स्मार्टवॉच असल्याचे सांगितले जाते.

Related Stories

गोदरेज प्रॉपर्टीजचा तिमाहीतला नफा वाढला

Amit Kulkarni

टोरेंट पॉवरच्या नफ्यात 88 टक्के वाढ

Amit Kulkarni

भारताची वाटचाल आर्थिक वृद्धीच्या दिशेने

Patil_p

नोकरदारांना अर्थसंकल्पात दिलासा शक्य

Patil_p

देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या घटली

Patil_p

फेसबुकची वर्क फ्रॉम होम योजना 2021 पर्यंत

Patil_p