Tarun Bharat

स्मार्टसिटी अधिकाऱ्याच्या घरात 23 लाख रुपये सापडले

कंत्राटदाराकडून 60 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळय़ात

 प्रतिनिधी /बेळगाव

कंत्राटदाराकडून 60 हजार रुपये लाच स्वीकारताना स्मार्टसिटीचा अधिकारी एसीबीच्या जाळय़ात अडकला असून या अधिकाऱयाच्या घरात 23 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

स्मार्टसिटी कार्यालयातील जनरल मॅनेजर (टेक्नीकल) सिध्दनायक दोडबसाप्पा नायकर याला अटक करण्यात आली आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक जे. एम. करुणाकरशेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, एच. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. संजीवकुमार नवलगुंद (रा. गणेशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. संजीवकुमार हे अपूर्वा कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. स्मार्टसिटी योजनेंतर्गत त्यांनी बस थांब्यांची उभारणी केली आहे. त्याची बिले मंजूर करण्यासाठी सिध्दनायक यांनी 60 हजारांची लास मागितली होती.

त्यामुळे संजीवकुमार यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. गुरूवारी आपल्या घरात 60 हजारांची लास स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी सिध्दनायकला रंगेहात पकडले आहेत. या कारवाईनंतर घरात तपासणी केली असता 23 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम मिळाली असून सिध्दनायक हा मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी आहे.

रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करण्यात येत होती. इतकी मोठी रक्कम कोठून आली? याचे मुळ शोधण्याचे कामही अधिकाऱयांनी हाती घेतले असून या संबंधी तरुण भारतने एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता अद्या चौकशी सुरू आहे. ती रक्कम कोठून आली? या संबंधी कसलीच माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

बेळगावात कोविड आइसोलेशन केंद्र सुरु करा : भाजप नेते किरण जाधव यांची मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Archana Banage

अलतगा ब्रह्मलिंग देवस्थानची नूतन कार्यकारिणी जाहीर

Amit Kulkarni

तिसऱया रेल्वेगेटवर सर्वाधिक लांबीचा स्पॅन

Amit Kulkarni

वापराविना ग्लासहाऊस धूळ खात पडून

Amit Kulkarni

कुंदरगी पंपहाऊसजवळ जलवाहिनीला भगदाड

Amit Kulkarni

पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय

Amit Kulkarni