Tarun Bharat

स्मार्टसिटी योजनेतील रूग्णालयाची इमारत सज्ज

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्टसिटी योजनेअंतर्गत वंटमूरी येथे 30 बेडचे प्रसृतीगृह उभारण्यात येत असून इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. कोरानाचा प्रसार वाढल्याने रूग्णांना अडचणी निर्माण होवू नयेत याकरिता इमारतीचे काम पुर्ण करण्याची सुचना जिल्हा आरोग्य विभागाने केली होती. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीने सदर इमारत जिल्हा आरोग्य केंद्राकडे हस्तातंर केली असून रूग्णालयाचा वापर कोरोना बाधित रूग्णांसाठी करणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरवासीयांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून याअंतर्गत स्मार्ट प्रसृतीगृह उभारण्याची तरतूद केली होती. वंटमूरी येथे आरोग्य खात्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेत स्मार्टसिटी योजनेमधून 2 कोटी 75 लाखाचा निधी खर्च करून स्मार्ट इमारत उभारण्यात आली आहे.  30 बेड, ऑपरेशन थिअटर, प्रयोगशाळा आणि आरोग्य अधिकाऱयांना आवश्यक सुविधा, नर्स रूम, स्टाफ रूम आदीसह रूग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधासह प्रसृतीगृह सज्ज झाले आहे. उपनगरात प्राथमिक उपचार सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. पण प्रसृतीगृह उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही विभागात स्मार्टसिटी योजनेअंतर्गत निधीची तरतूद करून प्रसृतीगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापैकी वंटमूरी येथील जागेत 30 खाटाचे प्रसृतीगृह उभारण्यात आले आहे. सदर इमारतीचे काम पुर्ण झाले असून याठिकाणी आवश्यक यंत्रोपकरणे उपलब्ध करून वैद्यकिय आधिकारी, नर्सची नियुक्ती करण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची आहे.

पण सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य खात्याने सरकारी रूग्णालये सज्ज ठेवण्यासह खासगी रूग्णालयांची निवड केली आहे. आवश्यकता भासल्यास वंटमूरी येथे बांधण्यात आलेल्या रूग्णालयाचा वापर कोरोना वॉर्डकरिता वापरण्याचा विचार आरोग्य खात्याचा आहे. त्यामुळे सदर इमारतीचे काम पुर्ण झाल्यास आरोग्य खात्यासाठी उपलब्ध करण्याची सुचना स्मार्टसिटी कंपनीला करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरीत कामे पुर्ण करून स्मार्टसिटी कंपनीने सदर इमारत जिल्हा आरोग्य खात्याकडे हस्तांतर केली असून आवश्यक साहित्य आरोग्य खात्याच्या वतीने उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती स्मार्टसिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी दिली.

Related Stories

बेळगावात 72 पोलिसांना कोरोनाची लागण

Amit Kulkarni

कोरोना योद्धे म्हणून पत्रकारांचे कार्य मोलाचे

Amit Kulkarni

शिवसेना खासदार हेमंत गोडसे 25 रोजी बेळगावमध्ये

Patil_p

चांगल्या गोष्टीत खोड्या घालायला मी पाटील नाही महाडिक आहे, शौमिका महाडिकांचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल

Rahul Gadkar

धामणे बसवाण्णा मंदिर चोरीबाबत नागरिकांची पोलीस निरीक्षकांशी चर्चा

Patil_p

व्हीटीयूच्या पदवीदान समारंभात गोंधळ

Tousif Mujawar