Tarun Bharat

स्मार्ट सिटी बसथांब्यांवर मराठीतही फलक लावा

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणाऱया बसथांब्यांना नावे देण्यात आली असून ती फक्त कानडी व इंग्रजीमध्ये आहेत. त्या ठिकाणी मराठी भाषेत नाव लिहिलेले नाही. हा मराठी भाषिकांवर अन्याय असून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे. तेव्हा सदर बसथांब्यांवर इंग्रजी व कानडीसह मराठी भाषेतही नाव लिहावे, अशी मागणी माजी तालुका पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन त्यांनी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांना दिले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे अनेक कामांना खिळ बसली. रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, रुंदीकरण बऱयापैकी झाले आहे. तसेच काही बस थांबेही पूर्ण झाले आहेत. परंतु त्यावर कानडी व इंग्रजी भाषेतच नाव लिहिले आहे.

कायद्यानुसार एखाद्या राज्यात, जिल्ह्य़ात 15 टक्क्मयांहून अधिक इतर भाषिक असतील तर त्या भाषेमध्ये सरकारी फलक आणि नावे लिहिणे बंधनकारक आहे. बेळगाव शहरात 50 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक असून बेळगाव जिल्हय़ात 25 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक आहेत, असे असूनही मराठीमध्ये फलक न लावणे हा मराठी भाषिकांवर अन्याय असून त्यांचा हक्क डावलण्याचा प्रकार आहे. तेव्हा सर्व नावे मराठी भाषेतही लिहावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

गुंजीत ग्रा. पं. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला

Patil_p

दारिद्रय़ातही तान्हुल्याच्या उपचारासाठी धडपड

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

बंगाली कारागिरांनी पळविले दोन किलो सोने

Amit Kulkarni

बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी चिंताजनक

Patil_p

7 लाख 16 हजार 925 हेक्टरमध्ये खरीप हंगामाचे उद्दिष्ट

Omkar B