Tarun Bharat

स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्या

Advertisements

काँग्रेस राज्य महिला अध्यक्षा बिना नायक यांची मागणी

प्रतिनिधी/ म्हापसा 

 गोव्यात आपल्या नातेवाईकांकडून बेकायदा रेस्टॉरंट चालविणाऱया केद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी काँग्रेसच्या गोवा महिला प्रदेश अध्यक्ष बीना नायक यांनी केली आहे.

  केंद्रातील भाजपा सरकार विरोधकांना ईडीचा धाक दाखवून आपल्या कुकर्मावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, केंद्रातील आपल्या मंत्र्यांना त्यांची  खुलेआम बेकायदा कृत्ये करण्याची पक्षाकडून सूट दिली जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस राज्य महिला अध्यक्षा बीना नायक यांनी आंसगाव येथे केला.   भाजपच्या महिला व बालकल्याणमंत्री स्मृती ईराणी यांच्या जवळच्या नातलगाकडून आंसगाव येथे स्थानिक मृत व्यक्तीच्या नावाने देशी तसेच विदेशी दारु विक्री विनापरवाना रेस्टॉरंट चालवले जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस महिला समितीकडून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणी यांना मंत्रिमंडळातून तात्काळ डच्चू देण्याणी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

शनिवारी दुपारी आंसगांव येथे सिली-सोल्स रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारात महिला काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी बीना नायक बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत महिला उपाध्यक्षा रेणुका देसाई, म्हापसा गटाध्यक्ष प्रतीक्षा खलप, सांत आंदेच्या गटाध्यक्ष फेलिसीया रापोझो, उत्तर गोवा काँग्रेस उपाध्यक्षा रोशन देसाई यांच्यासह शिवोली मतदारसंघातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

दरम्यान, संबंधित वादग्रस्त रेस्टॉरंटचा परवाना तसेच त्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र  मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आल्याची माहिती प्रतीक्षा खलप यांनी दिली. यावेळी उपस्थित महिला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. 

आंसगावांत निदर्शने करतेवेळी रेस्टॉरंट चालकाचा सहकारी असलेल्या एकाकडून महिला काँग्रेसच्या निदर्शनात वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या हणजूण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.  

Related Stories

अन् तिने बिबटय़ाला जेरबंद केले

Amit Kulkarni

गैरव्यवहार करणाऱया संचालक मंडळावर खटले दाखल करा

Amit Kulkarni

गोव्याच्या तनिशा क्रास्टोला मिश्र दुहेरीत मिळाले सुवर्ण

Amit Kulkarni

वास्कोत महामार्गावर अपघातात चार वाहनांची हानी

Omkar B

राज्यातील 1.74 अब्ज टन खनिज कुठे उडून गेले ?

Amit Kulkarni

राजभवन जनताभिमुख बनविण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!