Tarun Bharat

स्मृती मानधनाची वनडे मानांकनात घसरण

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या ताज्या महिलांच्या वनडे क्रिकेट फलंदाजांच्या मानांकनात भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाची घसरण झाली असून ती आता सहाव्या स्थानावर आहे. मानधनाचे मानांकन दोन अंकांनी घसरले आहे. दरम्यान भारताच्या झुलन गोस्वामीने आयसीसीच्या महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत आपले पाचवे स्थान कायम राखले आहे.

आयसीसीच्या महिलांच्या वनडे क्रिकेट फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची मिताली राज 687 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मानधना 732 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. या मानांकनात पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडच्या ब्युमाँटने आघाडीच्या स्थानावर झेप घेताना विंडीजची टेलर व न्यूझीलंडची सॅटर्थवेट यांना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगपेक्षा ती 16 गुणांनी पुढे आहे. अलिकडे इंग्लंडच्या महिला संघाने न्यूझीलंडचा वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. विंडीजची स्टिफेनी टेलर दुसऱया तर न्यूझीलंडची सॅदर्टवेट तिसऱया स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या मानांकनात भारताची झुलन गोस्वामी 691 गुणांसह पाचव्या स्थानावर असून पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये भारताच्या पुनम यादव, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. त्यांनी आधीची स्थाने कायम राखली आहेत. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची जोनासेन 804 गुणांसह पहिल्या तर तिचीच सहकारी मेगन स्कट 735 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत ऑस्टेलियाची एलीस पेरी 460 गुणांसह पहिल्या तर भारताची दीप्ती शर्मा 359 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Related Stories

गावसकर म्हणतात, पारदर्शकता ठेवा!

Patil_p

‘सुवर्ण’स्वप्न भंगले; आता कांस्य पदकाची आशा

datta jadhav

विंडीज संघाची आगेकूच मालिका विजयाकडे

Patil_p

सुवेद पारकरचे पदार्पणात शतक

Patil_p

भारत-बेल्जियम उपांत्य फेरीत

Patil_p

न्यूझीलंडचा इंग्लंडवर मालिका विजय

Patil_p