Tarun Bharat

स्वच्छता कामगारांचे माजी महापौरांकडून अभिनंदन

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने शहरवासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र अशा बिकट स्थितीतदेखील मनपाच्या स्वच्छता कामगारांनी स्वच्छतेचे कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे माजी महापौर सरिता पाटील यांनी स्वच्छता कामगारांचे अभिनंदन करून रविवारी चहा नाष्टय़ाची व्यवस्था केली.

देशात कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात देखील कोरोना विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळल्याने शहरातील विविध भाग निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिक घरीच होते. पण महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांनी शहर आणि घरोघरी साचलेला कचरा उचल करण्याच्यादृष्टीने आपली सेवा सुरू ठेवली होती. ही सेवा देत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण स्वच्छता कामगारांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. त्याबद्दल माजी महापौर सरिता पाटील यांनी स्वच्छता कामगारांचे अभिनंदन केले. तसेच कोनवाळ गल्ली कार्यालयात नाष्टा व चहाची सोय उपलब्ध करून दिली.

Related Stories

अलोन स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

Patil_p

नेहरुनगर येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

Omkar B

रेल्वे स्थानकाला डॉ. शिवबसव स्वामीजींचे नाव द्या

Patil_p

कृषीपंपांसाठी भरावा लागणार विकासनिधी

Patil_p

वळिवाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका

Patil_p

आर्थिक समस्यांवर निडोनॉमिक्स प्रभावी

Amit Kulkarni