Tarun Bharat

स्वच्छता थर्मामीटरची

घरात लागणार्या वैद्यकीय उपकरणांपैकी एक म्हणजे  डिजिटल थर्मामीटर. हे थर्मामीटर नीट स्वच्छ करायला हवं. थर्मामीटर स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी…

  • ताप मोजण्यासाठी काही डिजिटल थर्मामीटर तोंडात ठेवावी लागतात. त्यामुळे अशा थर्मामीटरच्या वापरानंतर ती स्वच्छ करावी लागतात.
  • थर्मामीटरचा टोकाचा भाग थंड पाण्याने स्वच्छ करा. हे टोक साधारण एक ते दोन मिनिटं थंड पाण्याखाली धरून ठेवा. अर्थात यावेळी थर्मामीटरच्या डिस्प्लेवर पाणी पडू देऊ नका.
  • थर्मामीटर स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल वाईप्स किंवा रबिंग अल्कोहोलचा वापर करा. तोंडात जाणारं टोक नीट स्वच्छ करा. यासाठी मऊ कापड किंवा कापसाचा वापर करता येईल.
  • थर्मामीटर स्वच्छ केल्यानंतर ते आत ठेवण्याआधी नीट वाळवून घ्या. थर्मामीटर हवेने वाळू द्या. कोणत्याही टॉवेल किंवा रुमालाने पुसणं शक्यतो टाळा.

Related Stories

आहार हवा हृदयस्नेही

Omkar B

Herbal Tea : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी तयार करा ‘हर्बल टी’, जाणून घ्या टीप्स

Archana Banage

International Coffee Day 2022 : शरीराला आणि मनाला तरतरी आणणाऱ्या कॉफीचे फाय़दे- तोटे, जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

‘हेपेटाइटिस-ए’ पासून बचावासाठी…

Omkar B

हे गैरसमज जाणून घ्या

tarunbharat

निरोगी आणि चमकदार त्वचा हवी आहे? मग ‘या’ टिप्स करा फॉलो!

Archana Banage