Tarun Bharat

स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा

Advertisements

महांतेशनगर येथील गो शाळेला भेट देऊन घेतली माहिती : वेळेवर कामावर हजर राहण्याची स्वच्छता निरीक्षकांना केली सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी शुक्रवारी सकाळी विविध परिसराची पाहणी केली. तसेच महांतेशनगर येथील गोशाळेला भेट देऊन कामाच्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. वेळेवर हजेरी लावून स्वच्छतेचे काम व्यवस्थित करण्याची सूचना स्वच्छता कामगार आणि  अधिकाऱयांना  केली.

महापालिका आयुक्तांनी विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकांवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागात शुक्रवारी सकाळी भेट दिली. यावेळी दोन्ही विभागात स्वच्छतेचे काम कोणत्या प्रकारे चालते याची माहिती जाणून घेतली. सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत विविध भागांना भेटी दिल्या. कचऱयाची उचल व्यवस्थित केली जाते का? याची माहिती घेतली. तसेच काही ठिकाणी कचराकुंड असल्याने त्या हटविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना स्वच्छता निरीक्षकांना केल्या.

काही कामगार वेळेवर येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही स्वच्छता निरीक्षक देखील जबाबदारीने काम करत नसल्याचे आढळून आल्याने त्यांना सूचना केल्या. प्रत्येकाने वेळेवर हजर राहून स्वच्छतेचे काम करावे व नागरिकांच्या तक्रारी येवू नयेत याची दक्षता घ्या असे आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांना सुनावले.

या पाहणी दौऱयावेळी महांतेशनगर येथील गोशाळेला आयुक्तांनी भेट दिली. या ठिकाणी भटक्मया जनावरांना ठेवण्यात येते. तसेच ओल्या कचऱयापासून खत उत्पादनाचा प्रकल्पही राबविला जातो. या दोन्ही कामांची माहिती घेतली.

यावेळी महापालिकेचे पर्यावरण सहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी, पर्यावरण सहाय्यक अभियंते आदिलखान पठाण आणि स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

Related Stories

ऑटोरिक्षात गांजा विकणाऱया जोडगोळीला अटक

Patil_p

क्षत्रियांचे क्षात्रतेज सर्वसमावेशक हवे

Omkar B

पत्रकार संघाकडे साईराज चषक

Amit Kulkarni

खेडय़ांच्या विकासातून देशाचा विकास

Omkar B

मराठा मंदिरमधील रेडिमेड गारमेंट्सच्या सेलला प्रचंड प्रतिसाद

Amit Kulkarni

मराठा मंदिर देणार युवकांना लष्करी प्रशिक्षण

Amit Kulkarni
error: Content is protected !!