Tarun Bharat

स्वतंत्र सांगली तालुक्यासाठी जोर लावणार : आ. गाडगीळ

दिशादर्शक फलकावर कि.मी.चा उल्लेख करणार
विश्रामबाग रेल्वेस्टेशनवर पादचारी उड्डाण  पुलाबाबत महाव्यवस्थापकांना निवेदन

प्रतिनिधी / सांगली

सांगलीला अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यामुळे सांगली शहर व परिसरातील  लोकांची चांगली सोय झाली आहे. आता स्वतंत्र सांगली तालुका व्हावा. यासाठी राज्य शासनाकडे जोर लावणार आहे. अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. दरम्यान, सांगली शहरामध्ये लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लवकरच कि.मी.चा उल्लेख करण्यात येणार असून विश्रामबाग रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी उड्डाणपुल उभारण्यात यावा. अशी मागणी नुकतीच रेल्वेचे महाव्यवस्थापक  संजीव मित्तल यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मिरज तालुक्याचे विभाजन करून सांगलीला स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात यावा. ही मागणी जुनीच आहे, विशेषतः सांगली शहर आणि मिरज पश्चिम भागातील गावांच्या सोयीसाठी सांगलीला स्वतंत्र सांगली तालुका होणे गरजेचे आहे. सांगलीला काही महिन्यापूर्वीच अप्पर तहसीलदार कार्यालयाचे कामकाज सुरू झाले.

स्वतंत्र तालुका निर्माण करण्यासाठी शासनाच्या पातळीवर विलंब लागतो. त्यासाठी निधी आणि यंत्रणेची गरज असते. पण त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून सांगलीला स्वतंत्र तालुका निर्माण व्हावा. यासाठी आपण जोर लावणार आहे. असे सांगून गाडगीळ म्हणाले, सांगली शहरातील प्रमुख ठिकाणे, चौक आणि शहराच्या मुख्य कार्नरला आपण त्या त्या भागांची माहिती असणारे फलक  लावले आहेत.  या फलकावर लवकरच कि.मी.चा उल्लेख करण्यात येणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची नुकतीच आपण भेट घेतली असून मध्य रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण होत असताना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवर पादचाऱयांना ये जा करण्यासाठी पादचारी उड्डाणपुल उभारण्यात यावा. अशी मागणी केली आहे. विश्रामबाग रेल्वेस्टेशनच्या समोर वारणाली परिसरात मोठया प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. या लोकांना सतत काही कामाच्या निमित्ताने रेल्वे रूळ पार करावे लागतात. त्यासाठी विश्रामबाग स्टेशनवर पादचारी उड्डाणपुल उभा करणे गरजेचे आहे.

Related Stories

सांगली : कचरावेचक महिलांचे कामाच्या ठेक्यासाठी एस एम एस आंदोलन

Archana Banage

मणेराजूरीत कॉलेज युवकांच्या वादातून एकास भोकसले

Archana Banage

कसबे डिग्रज येथे क्षारपड जमिनीबाबत बैठक

Archana Banage

सांगली : कुंडलमध्ये क्रांतीअग्रणींना अभिवादन

Archana Banage

सांगली : आंदोलनामुळे 15 लाख लिटर दूध संकलन बंद

Archana Banage

तासगाव तालुक्‍यात आज सर्वाधिक 108 कोरोना रुग्ण

Archana Banage