Tarun Bharat

‘स्वदेश’च्या धर्तीवर उजळविले गाव

Advertisements

आफ्रिकेतील कोलरेर्डची अनुकरणीय कामगिरी

150 घरांना मिळतेय वीज

2004 साली ‘स्वदेश’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.  मोहन भार्गव या नासातील संशोधकाने स्वतःच्या गावातील विजेचा प्रश्न मार्गी लावल्याचे चित्रपटात दर्शविण्यात आले होते. पडद्यावरील या व्यक्तिरेखेला  आफ्रिकेतील मलावी देशातील एका व्यक्तीने सत्यात उतरविले आहे. मलावीतील योबे कोसी या दुर्गम गावात वीजेची सुविधा नव्हती.

मुलांना मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत होता. तेव्हा गावातील 23 वर्षीय कोलरेर्ड कोसीने परिवर्तनाची सुरुवात केली. घराजवळून वाहणाऱया जलप्रवाहात सायकलसारखे पॅडल मारल्यास विजेची निर्मिती होऊ शकते याचा अनुमान त्याला होता. याचमुळे त्याने घरातील टाकाऊ सामग्रीपासून डायनुमा तयार केला आणि त्याचे घर प्रकाशमान झाल्याची खबर गावात फैलावली.

मी यासंबंधी कुठलेच शिक्षण घेतले नव्हते. टर्बाइनसाठी मी जुन्या फ्रिजचा कॉम्प्रेसर गावातून वाहणाऱया नदीत बसविला. हा ‘जुगाड’ही यशस्वी ठरला आणि 6 घरांना पुरेल इतकी वीज तयार होऊ लागली. त्यानंतर भंगार ठरलेल्या मशीनमधून एक मोठे टबाईन गावाबाहेर बसविले. बांबूच्या खांबांवरून तारा नेत वीज आता गावातील घरांमध्ये पोहोचत असल्याचे कोलरेर्ड सांगतो.

वीज ग्रामस्थांना मोफत मिळत आहे. केवळ त्यांना प्रकल्पाच्या देखभालीच्या स्वरुपात 80 रुपये प्रतिघराच्या हिशेबाने द्यावे लागतात. गावाला प्रकाशमान करणारा कोलरेर्ड आता मिनी ग्रीड बसवू इच्छितो. कोलरेर्डने केवळ गावच नव्हे तर आमच्या जीवनातही प्रकाश आणल्याचे ग्रामस्थ सांगतात.

Related Stories

ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

Tousif Mujawar

पोर्श्चे ठरली सर्वात मूल्यवान कंपनी

Patil_p

डॉ. समीर कामत डीआरडीओचे प्रमुख

Amit Kulkarni

कठोर निर्बंधांबाबत आज कोविड टास्कफोर्सची बैठक

Patil_p

सैन्यमाघारीचे अमेरिकेकडून स्वागत

Patil_p

कोरोना : चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी विमानाने दिल्लीत दाखल

prashant_c
error: Content is protected !!