Tarun Bharat

स्वप्ना बर्मनचे निवृत्तीचे संकेत

वृत्तसंस्था/ कोलकाता

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱया पाठदुखीच्या समस्येमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी भारताची महिला ऍथलिट स्वप्ना बर्मनने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ती निवृत्तीची घोषणा करणार आहे.

रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करताना स्वप्नाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच वारंगळ येथे नुकत्याच झालेल्या 60 व्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत तिने उंच उडी या क्रीडाप्रकारात सुवर्ण मिळविले होते. या दुखापतीमुळे आपल्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत असल्याने आपण लवकरच निवृत्त होत असल्याचे स्वप्नाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चालू वर्षीच्या ऍथलेटिक हंगामामध्ये तिने फेडरेशन चषक आणि राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता.

Related Stories

जोकोविच, अल्कारेझ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

कास्पर रूड अजिंक्य

Patil_p

दहा हॉकीपटूंना ऑलिम्पिक पदार्पणाची संधी

Patil_p

श्रीकांत, ध्रृव-सिक्की, प्रणॉय पुढील फेरीत

Patil_p

मानांकनात मिताली तिसऱया तर मानधना सहाव्या स्थानी

Patil_p

न्यूझीलंडला फलंदाजीतील खराब फॉर्मची चिंता

Patil_p