Tarun Bharat

स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिकाऱ्यास मुकला – समरजितसिंह घाटगे

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्य सरकारच्या अनास्थेमुळे स्वप्नील लोणकरच्या रूपाने महाराष्ट्र एका उद्योन्मुख अधिका-यास मुकला आहे. असे भावपुर्ण उद्गार शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी काढले. फुरसुंगी येथे लोणकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीवेळी ते बोलत होते.
यावेळी स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांना घाटगे यांनी मिठी मारली आणि घाटगे यांच्या खांद्यावर डोके ठेवून लोणकर यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्वप्नीलची आई छाया,वयोवृद्ध आजीबाई सुमन बहिण पूजा,मामा अभिजीत या संपुर्ण कुटुंबियांसह उपस्थितांचे डोळे भरून आले.

यावेळी घाटगे म्हणाले, स्वप्नील हुशार होते. त्यांचा पिंड समाजसेवेचा होता. त्यांनी स्थापन केलेल्या पंचमुखी फाउंडेशन या सेवाभावी सःस्थेचे काम त्यांचे स्मरण म्हणून त्यांच्या पश्चात अव्याहतपणे चालू ठेवून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया. मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व तरुणांनी नोकरी या केवळ एकमेव पर्यायाचा विचार न करता व्यवसायाचा सुद्धा विचार करावा.अशा तरुणांचा पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.
यावेळी डबडबलेले डोळे आणि दाटलेल्या आलेल्या कंठात कातर स्वरात आपल्या भावना व्यक्त करताना स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर म्हणाले, अशा तरुण मुलांकडे आम्ही आई वडील उतारवयातील आधार म्हणून पाहत असतो. या मुलांच्या बरोबर आम्हीही काही स्वप्ने पाहिलेली असतात. याचा विचार करून तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. अशी मी तमाम तरूणांना हात जोडून विनंती करतो. अशा भावना व्यक्त केल्या.

स्वप्नीलची आई छाया यांनी सरकार आणखी किती स्वप्नील गमावण्याची वाट बघत आहे.असा खडा सवाल उपस्थित करून सरकारने अशा स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना ठोस धोरणातून शब्द द्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाऊ म्हणून मी ठामपणे उभा राहणार

यावेळी घाटगे यांनी लोणकर कुटुंबीयांचा आत्ता एकमेव आधार असलेल्या पूजाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शासकीय पातळीवर काय मदत होते याची थोडे दिवस वाट बघूया. त्यानंतर काहीही न झाल्यास मला भाऊ म्हणून केव्हाही फोन करा. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा आहे. असा दिलासा लोणकर कुटुंबियासह पूजाला दिला.

Related Stories

Kolhapur : कोल्हापूर-जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा खचला

Archana Banage

मोटरसायकल अपघातात हिरवडे दुमाला येथील एकाचा मृत्यू

Archana Banage

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण : पुण्यात एकाला अटक, चौघांचा शोध सुरु

Archana Banage

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आठ पदरी करा -अजित पवारांची मागणी

Abhijeet Khandekar

पिंपरी गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल

Archana Banage

नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Archana Banage