Tarun Bharat

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून ब्लू कार्नर नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही देशातील कायद्याचे उल्लंघन करून किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून गेलेल्यांविरोधात इंटरपोलकडून ही नोटीस जारी केली जाते. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ब्लू नोटीस बजावली जाते.

नित्यानंद भारतातून पळून इक्वेडोरमध्ये गेल्याच्या वृत्ताचे भारतातील त्यांच्या दूतावासाने खंडन केले होते. दक्षिण अमेरिकेमध्ये नित्यानंदला इक्वेडोरनेच आश्रय दिल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले होते. इक्वेडोरजवळ असलेल्या एका छोटय़ा बेटावर नित्यानंदने स्वतःचाच नवा देश निर्माण केल्याचीही चर्चा गेल्यावषी रंगली होती.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्याचवेळी नित्यानंद ज्या देशांमध्ये आश्रय घ्यायला जाण्याची शक्मता असल्याचे वाटते आहे तेथील सरकारशी संपर्क साधण्यात आला असून, नित्यानंद विरोधत असलेल्या गुह्यांची माहिती त्यांना देण्यात आली आहे.

स्वतःचा आश्रम चालविण्यासाठी धनिकांकडून देणगी आणण्यासाठी नित्यानंदने काही मुलांना बंधक बनवले होते. यावरून गुजरातमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात पोलिस त्याच्या शोधत आहेत.

 

Related Stories

‘भारत जोडो’मधून दीर्घ लढा देणार

Patil_p

केरळमध्ये रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Patil_p

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

Rohan_P

पंजाबमध्ये काँग्रेसला बसणार झटका

Patil_p

आसाममध्ये 104 वर्षीय ‘विदेशी’ वृद्धाचे निधन

Patil_p

एनपीएस, अटल पेन्शन खातेधारक वाढले

Patil_p
error: Content is protected !!