Tarun Bharat

स्वयंव्याधी निवारणाचा सिद्धांत

मागील लेखात (13.2.2021) म्हटल्याप्रमाणे प्राणिक हीलिंग ही पूरक उपचार पद्धती रुग्णाला हात न लावता आजार कसा बरा करते हे आपण या लेखात जाणून घेणारच आहोत पण त्याआधी या पूरक उपचार पद्धतीचा शोध कोणी व कसा लावला याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. या उपचार पद्धतीचे जनक मानल्या जाणाऱया ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई (GMCKS) यांचा जन्म फिलिपिन्समधील सेबू येथे झाला. अगदी लहान वयातच ग्रँडमास्टर चोआ यांना आध्यात्मिक विषयांमध्ये आणि ऊर्जेच्या उपचारांमध्ये रस निर्माण झाला. त्यांनी रोझिप्रुसिअन्स, थियोसोफी, अस्टारा, हूना, कबालाह आणि अशा प्रकारच्या असंख्य यंत्रणेच्या कामांचा अभ्यास केला. केमिकल इंजिनिअर म्हणून त्यांचे औपचारिक प्रशिक्षण आणि व्यावहारिकतेची भावना यामुळे त्यांना बरे करण्याचा दृष्टिकोन तयार करण्यास मदत झाली, जी नंतर प्राणिक हीलिंग सिस्टम बनली. सर्व प्राणिक हीलर ग्रँडमास्टर चोआ कोक सुई यांना प्रेमाने ‘मास्टर’ असे संबोधतात.

20 वर्षांपर्यंत, मास्टर चोआ यांनी अक्षरशः अखंड प्रवास केला, 6 खंडांवर 60 देशांमधील विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या सूचना दिली. मास्टर चोआ यांनी त्यांचे निधन होण्यापूर्वी 30 हून अधिक भाषांमध्ये 25 पुस्तके लिहून पूर्ण केली आणि 90 हून अधिक देशांमध्ये 100 पेक्षा जास्त प्राणिक हीलिंग सेंटर्स स्थापित केले. त्यांनी 20 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले, त्यातील काही पुस्तके विविध भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत आणि जगभरातील 90 पेक्षा जास्त देशात ती वाचली जात आहेत. त्यांनी प्राणिक हीलिंग, अर्हटिक योगा आणि जगभरातील उच्च आध्यात्मिक अभ्यासक्रम यावर 20 पेक्षा जास्त वेगवेगळे अभ्यासक्रम तयार केले, शिकवले. या अभ्यासक्रमांचे त्यांनी प्रमाणिकरण केले जे अनेक देशातील परवानाधारक शिक्षकांकडून अजूनही शिकविले जात आहेत. GMCKS चॅरिटेबल फौंडेशन या संस्थेची परोपकारी संस्था विविध देशांमध्ये आहार कार्यक्रम राबवते, गरीब रुग्णांना वैद्यकीय सहाय्य करते आणि जगभरातील आपत्ती निवारणासाठी हातभार लावते. ग्रॅन्डमास्टर चोआ कोक सुई यांनी मानवी देहभान वाढवण्याच्या इतर शारीरिक आणि कायदेशीर गरजा पुरवण्यासाठी अनेक देशांमध्ये अनेक धर्मादाय प्रति÷ानांची स्थापना आणि वित्तपुरवठादेखील केला. या दानशूर फौंडेशनने आजवर मानवतावादी मिशन सुरू ठेवले आहे. ग्रँडमास्टर चोआ कोक सुई मॉडर्न प्राणिक हीलिंग आणि अर्हटिक योगाचे संस्थापक आहेत.  स्वीकारलेल्या वास्तवांपेक्षा आध्यात्मिक सत्याचा अथक शोध, केमिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि त्याच्या व्यवसायातील हुशारीने संतुलित असल्यामुळे त्यांनी जगातील सर्व कामांमधून आधुनिक प्राणिक हीलिंग, अर्हटिक योग आणि त्याच्या इतर वृत्तीचा विश्वास अनुभवला.

या उपचार पद्धतीमध्ये हात न लावता उपचार दिले जातात. आपल्या शरीराच्या बाहेर जे ऊर्जेचे वलय असते त्यात बिघाड झाला की आपल्याला आजार उद्भवतात. मग एखाद्या रुग्णाला जर पाठदुखी आहे याचाच अर्थ त्याच्या पाठीच्या भागात असणाऱया चक्रांची ऊर्जा एकतर वाढली आहे किंवा कमी झालेली आहे. प्राणिक हीलिंग उपचारक म्हणजेच उपचार देणारा हा रुग्णाच्या पाठीला असणाऱया चक्रांची ऊर्जा तपासून पाहणार. तपासल्यानंतर उपचारकाच्या लक्षात येते की ऊर्जा वाढली आहे की कमी झालेली आहे. या उपचार पद्धतीमध्ये सर्वप्रथम ऊर्जा शरीराची स्वच्छता केली जाते म्हणजेच जी दूषित ऊर्जा रुग्णाच्या पाठीत आहे ती बाहेर काढली जाते. त्यामुळे ऊर्जा वाहिनी नाडय़ांमधील अडथळा निघून जाण्यास मदत होते. शरीरातील वापरून झालेली व साठून राहिलेली ऊर्जा बाहेर काढून टाकल्यामुळे ऊर्जा शरीर स्वच्छ होते व ऊर्जेचे असंतुलन कमी किंवा नाहीसे होते. त्यानंतर पाठीला आवश्यक ऊर्जा दिली जाते. त्यामुळे शरीराला ताजी प्राणशक्ती मिळते व शरीर पुन्हा सशक्त व चैतन्यपूर्ण होते. संपूर्ण शरीरातील ऊर्जासंचार वाढतो. ऊर्जा संतुलन होते व आरोग्य सुधारते. शरीरातील स्व-व्याधीनिवारण क्षमताही वाढते. या सगळय़ाचा परिणाम भौतिक शरीरावर दिसून येतो.

अनेक वर्षांच्या संशोधनातून आणि वैज्ञानिक प्रयोगातून असे सिद्ध झाले आहे की ऊर्जाशरीर व भौतिक शरीराचा एकमेकांशी घनि÷ संबंध आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की व्यक्तीच्या एका शरीरावर झालेला परिणाम काही वेळातच दुसऱया शरीरावर दिसून येतो. ऊर्जाशरीरावर झालेल्या बदलांचा परिणाम भौतिक शरीरावर आणि भौतिक शरीरावर झालेल्या बदलांचा परिणाम ऊर्जाशरीरावर होतो. असेही आढळून आले की कुठलाही आजार हा प्रथम व्यक्तीच्या ऊर्जाशरीरावर उद्भवतो व कालांतराने भौतिक शरीर आजारी आजारी पडते, ही गोष्ट आपण रोजच्या जीवनातही अनुभवतो. अनेकदा ताप येण्यापूर्वी काही तास आपल्याला शरीरात मरगळ, थकवा जाणवतो. प्रत्यक्ष तेव्हा ताप नसतो, पण अस्वस्थपणा जाणवतो आणि काही वेळाने ताप येतो. तापापूर्वीचा हा अस्वस्थपणा किंवा मरगळ जाणवण्याचे कारण हेच असते की त्यावेळी ताप या आजाराचा प्रवेश ऊर्जाशरीरात झालेला असतो आणि आपले ऊर्जाशरीर असंतुलित झालेले असते. प्राणिक हींलिंगद्वारे ऊर्जाशरीरावर केलेले उपचार हे काही वेळात भौतिक शरीरावर परिणाम करतात आणि आजार बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. प्राणिक हींलिंगद्वारे ऊर्जाशरीरावरील ‘उर्जाकेंदे’ किंवा ‘चपे’ ही आपले भौतिक शरीरच नव्हे तर आपल्या भावना, विचार, आपले नातेसंबंध, इतकेच नव्हे तर आपली आर्थिक स्थितीसुद्धा नियंत्रित करतात. याचाच अर्थ असा की प्राणिक हीलिंग या पूरक उपचार पद्धतीने आपण आपल्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच नातेसंबंधातील अशा सगळय़ा समस्या दूर करण्यासाठी उपयोग करू शकतो. एकदा तुमच्या सर्व चक्रांमधून दूषित, रोगग्रस्त ऊर्जा, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना काढून टाकल्या की तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

उपचारासाठी बाह्य घटकांचीच गरज असते असे काही नाही. आपल्या शरीरात स्वतःच स्वतःला बरे करण्याची क्षमता असते. अनेक किरकोळ आजार विशेष उपचार न करता आपोआप बरे होतात. अनेकदा आपल्याला किरकोळ जखम होते आपण प्रत्येकवेळी त्या जखमेवर मलमपट्टी करत नाही. तरीही काही दिवसानंतर ती जखम आपोआप भरते. अनेक व्हायरस किंवा विषाणूंमुळे होणाऱया आजारावर आजही उपचार उपलब्ध नाहीत परंतु तरीही व्हायरसमुळे होणाऱया सर्दी खोकल्यापासून 4 ते 5 दिवसात कुठल्याही औषधाशिवाय शरीर पूर्णपणे स्वतःला बरे करते. याचाच अर्थ शरीरात स्वतःला बरे करण्याची नैसर्गिक क्षमता असते. फक्त त्यासाठी गरज असते शुद्ध ऊर्जेची. यालाच म्हणतात ‘स्वयंव्याधी निवारणाचा सिद्धांत’. पण या स्वयंव्याधी निवारण्याच्या क्षमतेला काही मर्यादा आहेत.

एखाद्या व्यक्तीचा जर अपघात झाला किंवा त्या व्यक्तीला एखादा दुर्धर आजार झाला तर ती व्यक्ती स्वतःहून पूर्ण बरे होण्याची अपेक्षा आपण करूच शकत नाही. अशावेळी त्या व्यक्तीवर बाह्य उपचार करणे, औषध देणे इत्यादी गोष्टी  कराव्याच लागतात. म्हणजेच कुठल्यातरी बाह्य घटकाची आवश्यकता असते. या घटकाच्या सिद्धांतालाच ‘प्राणशक्तीचा सिद्धांत’ असे म्हटले जाते. स्वयंव्याधी निवारणासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा ही या घटकाद्वारे पुरविली जाते. अनेकवेळा हे घटक औषधांद्वारे पुरवले जातात, ज्यातून मिळणारी ऊर्जा ही रुग्णाची व्याधीनिवारणाची क्षमता वाढवते व आजार बरे होतात.

आज्ञा अभिषेक कोयंडे

Related Stories

अर्थसंकल्पाने आयकरदात्यांना चकविले!

Patil_p

सखोल चौकशी आवश्यकच

Patil_p

नवा काळ…नवे शिक्षण

Patil_p

बळीराजासाठी एक पाऊल मागे घ्या

Omkar B

एका अभिप्रायाची गोष्ट

Patil_p

भगवदगीता,सनातन विज्ञान

Patil_p