Tarun Bharat

स्वरांजली कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव 

येथील सागर शिक्षण (बी. एड.) महाविद्यालयात सोमवारी स्वरांजली कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्रार्थना, भजने, भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, सिनेमागीते सादर करण्यात आली. सादर केलेल्या गीतांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी मराठी, हिंदी, कन्नड गीते सादर केली. हार्मोनियमवर विनायक मोरे, सिंथेसायझरवर शशिकांत लोहार तर तबल्यावर संतोष पुरी यांनी साथ दिली. सोनाली चोपडे, अश्विनी गावडे, स्वागी सुळगेकर, योगिता कटांबळे, माया मेलगे, पूजा गुरव आदींनी सादरीकरण केले. प्रा. कल्पना धामणेकर यांनी आभार मानले.

Related Stories

मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये व्याख्यान

Amit Kulkarni

मोटारसायकलच्या ठोकरीने अनोळखी युवकाचा मृत्यू

Patil_p

गणरायांचे आगमन होणार खड्डेमय रस्त्यावरून

Amit Kulkarni

शहरवासियांना नागरी सुविधा पुरविण्यास मनपा अपयशी

Patil_p

कांदा मार्केटमध्ये खोका उभारणीमुळे तणाव

Nilkanth Sonar

लव्ह जिहादविरोधात हमारा देश संघटनेतर्फे मोर्चा

Patil_p
error: Content is protected !!