Tarun Bharat

स्वराज्यजननी जिजामाता मालिका रंजक वळणावर

राजमाता जिजाऊ म्हणजे नेतफत्व, कतफ&त्व, मातफत्वाची मूर्ती! हळवी आई आणि कणखर राज्यकर्ती अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे. दरम्यान, मालिका आता एका वेगळय़ा उंचीवर आली असून, कधानक पुढे सरत जाईल तशी मालिका नव्या वळणावर येणार आहे.

जिजाऊंचे पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱयांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. महत्त्वाच्या घडामोडींच पेंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण  आता स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय बघायला मिळणार? याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱया काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील दादोजी कोंडदेव यांचे पात्र कशा प्रकारे रंगविले जाईल ? याची उत्सुकता देखील आहेच याबद्दल बोलताना निर्माते सांगतात की इतिहासाला अनुसरूनच हे पात्र असणार आहे. जिजाऊंच्या पुण्यात घडणाऱया घडामोडींवरील हे विशेष भाग सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळतील.

जिजाऊंनी निर्धार, अफाट प्रज्ञा, अपूर्व धाडस आणि विजीगिषू वफतीने सर्व संकटांवर मात केली. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण व त्याचे वेगवेगळे पदर याचा रंजक तितकाच गौरवशाली इतिहास येत्या काही दिवसात स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी, वर्धनासाठी जिजाऊंचे योगदान अजोड आहे. जिजाऊंच्या कतफ&त्वाचे असंख्य पैलू उजेडात आणणारी स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सोमवार ते शनिवार रात्रौ 8.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

Related Stories

चिनी प्रेक्षकांनी हॉलिवूडकडे पाठ फिरवली

Patil_p

सलमान खानच्या हत्येचा कट उधळला; शार्प शूटर राहुलला उत्तराखंडातून अटक

Tousif Mujawar

सोनाक्षीही होणार दुसरी पत्नी

Patil_p

घरजावई होणाऱ्याशीच करणार विवाह

Patil_p

अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Tousif Mujawar

हंसल मेहता यांच्या चित्रपटात करिना

Patil_p