Tarun Bharat

स्वराविष्कारात रंगला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’

ऑनलाईन टीम  / पुणे  :  

पं. राजन मिश्रा व साजन मिश्रा यांची यमन रागातील ए सुहागन प्यारिया या बड्या ख्यालाने सुरु झालेली मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली… चम्पाकली रागातील लाज न आयी बलमा..ही रुपक तसेच एकतालातील सगरी रैन मोहे जागत रे..व शेवटी जगत में झुटी देखी तेरी प्रीत हे गुरु नानकजींचे भजन… अशा सर्वोत्तम रचनानी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते प्रसिद्ध जलतरंग वादक ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे’ (सातारा) यांच्या २३ व्या स्मृतीच्या निमित्ताने ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोहा’चे…!!

‘कै.पं. शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोहा’चे आयोजन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या समारोहाचे हे २३ वे वर्ष होते. यावेळी पं. राजन मिश्रा व पं. साजन मिश्रा आपल्या गायकीने कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे यांना मानवंदना दिली. त्यांना पं. अरविंद थत्ते संवादिनीवर तर पं. अरविंद कुमार आझाद हे तबल्यावर साथसंगत केली.

समारोहाची सुरुवात मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंग वादनाने झाली. त्यांनी पुरियाधनश्री रागात आलाप जोड व झाला व त्यानंतर झपतालातील बंदिश सादर केली मध्यलयीच्या तीनतालातील ‘पायलिया झनकार’ या बंदिशीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सवाल जावाब व जुगलबंदी विशेष उल्लेखनीय. त्यांना तबल्यावर गणेश तानवडे तर पखवाजवर गणेश पापळ यांनी साथ सांगत केली.

यावेळी बोलताना मिलिंद तुळाणकर म्हणाले की, आमचे आजोबा कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे यांच्या स्मरणार्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आजोबांकडून आलेला हा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो.

Related Stories

सोलापूर : आंदोलनासाठी एक लाखाच्या उपस्थितीचा दावा; प्रत्यक्षात हजाराच्या आसपास कार्यकर्ते

Archana Banage

Solapur; विवाहितेची मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या; घातपातीचा संशय

Abhijeet Khandekar

धामणगाव : 350 वर्षांत पहिल्यांदाच आषाढी यात्रेला ब्रेक

Archana Banage

गणरायाच्या आगमनानिमित्त विठोबाला दुर्वांची आरास

Archana Banage

लऊळ शिवारातील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

Archana Banage

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन

Archana Banage