Tarun Bharat

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हा क्रीडांगणावर होणार कार्यक्रम

प्रतिनिधी बेळगाव

शनिवारी जिल्हा क्रीडांगणावर होणाऱया स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सशस्त्र दलांचे पथसंचलन असणार आहे.

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला ज्वोल्ले, वस्त्राsद्योगमंत्री श्रीमंत पाटील, विधान परिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, विधानसभेचे उपाध्यक्ष विश्वनाथ मामनी आदींसह जिल्हय़ातील आमदार, खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे.

ध्वजारोहणानंतर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणाऱया या कार्यक्रमात भाग घेताना प्रत्येकांना शासकीय नियमांचे पालन करावे लागणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमंत्रणपत्रिकेत जिल्हा प्रशासनाने यासंबंधी कोणत्याच सूचना केल्या नाहीत.

Related Stories

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

Omkar B

नवी गल्लीतील ड्रेनेज चेंबर तुंबल्याने समस्या

Amit Kulkarni

जीएसटी चुकवेगिरीमुळे नागरिकांना बसतोय फटका

Amit Kulkarni

पूर्व भागात जनावरांना लम्पिस्किनची लागण

Amit Kulkarni

कर्नाटकात २४ तासात आढळले पाच हजाराहून अधिक रुग्ण

Archana Banage

शिरहट्टी येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी

Patil_p