Tarun Bharat

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘येथे’ पहिल्यांदाच फडकला तिरंगा

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

श्रीनगरच्या लाल चौकातील ‘प्रेस एन्क्लेव्ह’ या इमारतीवर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा वाद आजवर कायम होता. मात्र, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू बदलत आहे. लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्ह इमारतीवर तिरंगा फडकल्याने देशप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. 

दरम्यान, यापूर्वी लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे काम 1992 मध्ये भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले होते. 

Related Stories

नियंत्रण रेषेवरील तैनात जवानांना मिळणार अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स

datta jadhav

अमरिंदर – सिद्धू एकत्र काम करणार

Amit Kulkarni

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

Patil_p

टेटे संघाच्या सराव दौऱयाला शासनाची मान्यता

Patil_p

जयराम रमेश यांचा माफीनामा

Patil_p

आरबीआयने घटवला जीडीपीचा अंदाज

Patil_p
error: Content is protected !!