स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारे मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. “भाई – व्यक्ती की वल्ली’’ या चित्रपटात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मांजरेकर आता सावरकरांची जीवनगाथा मोठय़ा पडद्यावर घेऊन येणार आहेत.संदीप सिंग आणि अमित वाधवानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. मांजरेकरांनी ऋषी वीरमणी यांच्या साथीनं या चित्रपटाचं लेखन केलं आहे. सावरकरांच्या 138व्या जयंतीचा मुहूर्त साधत मांजरेकरांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर’’ या आगामी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लाँचद्वारे करण्यात आली आहे.अर्णब चॅटर्जी या चित्रपटाचे डीओपी असून, हितेश मोडक आणि श्रेयस पुराणीक या चित्रपटाला संगीत देणार आहेत. लीजेंड ग्लोबल स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सावरकरांची भूमिका कोण साकारणार याबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. चित्रपटातील इतर कलाकारांची घोषणाही अद्याप केलेली नाही.


previous post
next post