Tarun Bharat

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी द्या

Advertisements

‘चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फाईटर असोसिएशननची मागणी

प्रतिनिधी/ पर्वरी

 येत्या 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्तीदिनाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याने सरकारने 100 कोटी रुपये खर्च करुन संपूर्ण वर्षभर कार्यक्रम करण्याचे आयोजन केले आहे. याला आमचा विरोध नसून जी स्वातंत्र्यसैनिकांची मुले अजूनही सरकारी नोकरीपासून वंचित आहेत, त्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी ‘चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फाईटर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.

 गेले वर्षभर या संघटनेतर्पे आम्ही आंदोलन केले आहे. सरकारी आकडय़ानुसार  250 जण स्वातंत्र्यसैनिकांची मुले सरकारी नोकरीपासून वंचित आहे. पण आमच्या नावनोंदणीनुसार फक्त 97 स्वांतत्र्यसैनिकांची मुले नोकरीशिवाय आहे. त्यांना सरकारने नोकरी द्यावी. ज्यांची वर्षे 50 पेक्षा जास्त झाली आहे त्यांचा कायमस्वरुपी तोडगा काढावा. काहींची गृह खात्यात नोंदणी नाही त्यांची नोंदणी करावी अशा अनेक  मागण्या आमच्या आहेत. याविषयी आम्ही मुख्यमंत्री मुख्य सचिव यांना निवेदन दिले आहे. आता राष्ट्रपतीला आम्ही या विषयी निवेदन देणार आहे. तसेच 19 डिसेंबर रोजी आम्ही गोवा मुक्तीदिनाचा कार्यक्रमाला सहभागी होणार आहे, असे या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी मुकुंद शेट यांनी सांगितले.

मागण्या मान्य झाल्यानाहीतर आंदोलन

 आम्ही आमच्या 17 मागण्यांची यादी सरकारकडे दिली आहे या मागण्या सरकारने  पूर्ण कराव्यात अन्यथा 19 डिसेंबर नंतर आम्ही पुन्हा मोठे आंदोलन करणार आहे. अनेक वर्षापासून स्वांतंत्र्यसैनिकांच्या मुलांना काहीच नोकऱया दिल्या नाही. त्यांच्या जागेवर अन्य लोकांची नोकरभरती केली जाते. आम्हाला आणखी राखिवता नको आहे sजेवढी राखिवता आहे तेवढय़ाच पदांची भरती करा. सरकारने आता 10 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील फक्त आम्हाला 97 पदे सरकारने द्यावी, असेही यावेळी डॉ. शिवाजी मुकुंद शेट यांनी सागितले.

100 कोटीचा योग्य वापर करावा

 सरकारने या कार्यक्रमासाठी जी समिती काढली आहे त्यात आम्हाला विश्वासात घेतले नाही. आज सरकार 100 कोटी रुपये खर्च करायला पाहत आह यापेक्षा या स्वांतंत्र्यसैनिकांचा  गरिब कुटुंबाला अर्थिक मदत करा व त्यांच्या कुटुंबाच्या सदस्याला  नोकरी द्यावी. एवढी मोठी रक्कम खर्च करण्यापेक्षा त्या पैशाचा योग्य वापर करावा. सरकारने आमची फक्त फसवणूक केली आहे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी  आम्हाला आश्वासन दिले होते त्यांच काहीच झाले नाही. सावंत सरकारने याची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी या संघटनेच्या सचिव रेश्मा दातये, तसेच काही स्वांतंत्र्य सैनिक व त्यांची मुले उपस्थित होती.

Related Stories

म्हापशात क्वारंटाईन असणाऱया परप्रांतियांचा गोंधळ

Omkar B

मास्तीमळ प्रभागात पाणीटंचाई

Patil_p

नुवे, श्रीस्थळच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह नदीत सापडला

Amit Kulkarni

पर्ये मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षभरात मिटणार

Amit Kulkarni

प्रत्येक पिढीला चित्रपट प्रेरणा देतात

Amit Kulkarni

पणजीत आज शिमगोत्सव मिरवणूक

Amit Kulkarni
error: Content is protected !!