Tarun Bharat

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे मान्यवरांचा गौरव

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघ आणि इतर अनेक संस्थांच्या विद्यमाने शुक्रवारी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम टिळकवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक भवनमध्ये झाला.

यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, जांबोटीचे अरुण महाराज (कनगुटकर), कर्नाटक राज्य लघुउद्योग संघाचे अध्यक्ष संतोष होंगल, स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी, सुनील चिगुळकर यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे विद्यमान कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी, संतोष भेंडीगेरी, स्वातंत्र्यसैनिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी, मोहन लाड, अधिवक्ता पोतदार, विजयकुमार नंदिहळ्ळी, जायंट्स गुप बेळगाव (मेनचे) मोहनराव सारेकर, कुटे यासह जायंट्स सखी, सिद्धार्थ बोर्डिंग, कुस्तीगीर संघटना, मराठा जागृती संघ आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करणाऱयांना नोटिसा

Patil_p

महामेळाव्यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

Patil_p

‘त्या’ कॅन्टर चालकाविरुद्ध एफआयआर दाखल

Amit Kulkarni

तब्बल 15 दिवसांनी स्वॅब अहवाल उपलब्ध

Omkar B

राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवणारी दौड

Patil_p

शाळांचा परिसर हिरवाईने नटणार

Patil_p