Tarun Bharat

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त रेल्वे पोलिसांची साताऱयातून जनजागृती रॅली

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

संपूर्ण भारत स्वातंत्याची पंचाहतरावी साजरी करत असून शासकीय पातळीवर विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज Rझ्इ रेल्वे पोलिसांकडून सातारा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. 

रेल्वे सुरक्षा अभियान अंतर्गत प्रवाशांना जागृत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या रॅलीची सुरुवात 1 जुलै रोजी कोल्हापूर येथून झाली असून यात पाच मोटारसायकलीवरून दहा जवान आणि सोबत अधिकारी असे पंधरा लोक सहभागी झाले आहेत. सांगली, मिरज कराड ओगलेवाडी करत ही रॅली आज सातारा शहरात दाखल झाली.  

सातारा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी त्यांचे स्वागत केल्sढ. ही रॅली वाहतूक शाखा कार्यलय ते राजपथावरून राजवाडा व कर्मवीर भाऊराव पाटील पथावरून पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका या ठिकाणी समाप्त झाली. या वेळी बोलताना एस. आर. शिवराम मीना म्हणाले, नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान कोणतीही अडचण आल्यास नव्याने सुरू केलेल्या हेल्पलाईन न. 139 चा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. 

Related Stories

भालेरावांच्या काव्य मैफिलींने ग्रंथ महोत्सवास प्रारंभ

Patil_p

97.15 टक्के लोक होताहेत घरीच बरे

datta jadhav

सातारा : जिल्हा पाच हजारापुढे; कराडमध्ये व्हेंटीलेटर अभावी सहावा बळी

Archana Banage

हवाई वाहतूक मंत्र्यांना मलकापूर पालिकेचे साकडे

Amit Kulkarni

शाळेतील टीव्ही चोरणारी टोळी गजाआड

datta jadhav

सिंहांच्या कार्यालयात बिबट्या आल्याने खळबळ

datta jadhav
error: Content is protected !!