Tarun Bharat

‘स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी’ तांबवे सुन्न!

Advertisements

संपूर्ण गाव लॉकडाऊन, प्रशासकीय अधिकाऱयांचा तळ, पंचक्रोशीत नाकाबंदी 

प्रतिनिधी / कराड / तांबवे

कराड तालुक्यातील प्रगतशील, स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया तांबवे गावात कोरोचा रूग्ण सापडल्याने गुरूवारी सायंकाळपासून गाव सुन्न झाले आहे. तांबवेत रूग्ण सापडल्याने कराड शहरासह संपूर्ण तालुक्यात भीतीची छाया पसरली आहे. परिणामी जिल्हाधिकाऱयांनी कराडमध्ये आजपासून आयोजित केलेला जनता कर्फ्यू रद्द केला असला तरी लोकांनी स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळला. अशीच परिस्थिती सुपने मंडलासह तालुक्याच्या अनेक गावांमध्ये दिसत आहे. जिल्हाधिकाऱयांनीही कराडला तातडीची भेट देऊन आढावा घेतला.

  तांबवे (ता. कराड) गावातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील बाधित व्यक्तीच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य काहीजणांनाही आरोग्य विभागाने गुरूवारी व शुक्रवारीही तपासणीसाठी नेले. गुरूवारी व शुक्रवारी संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना रूग्णाच्या संपर्कात असलेल्या 50 लोकांना गावातून तपासणीसाठी विलगीकरण कक्षात हलवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संगिता देशमुख यांनी सांगितले.

  पोलीस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आला आहे. गावातील कोणीही बाहेर पडणार नाही, बाहेर आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गावातील संबंधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली होती त्यांनी स्वतः आवश्यक त्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन, आरोग्य विभागाला माहिती द्यावी. त्यांनी स्वतः तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शुक्रवारी पोलिसांनी संपूर्ण गाव अत्यावश्यक सेवेसह लॉकडाऊन केले होते.

गावातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आणखी कोण कोण आले होते. याचा सर्वे अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत केला जात आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत 50 लोकांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले होते. अजूनही अनेक लोकांचा सर्वे बाकी असल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

महाराणी येसुबाईंची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले – अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

Archana Banage

हॉटेल ‘द ललित’मधील रहस्य रविवारी उघड करणार

datta jadhav

मोदी-ठाकरे भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Archana Banage

रुद्राक्ष टॉवरमध्ये दोन कुटुंबात हाणामारी

Patil_p

चौदा जिल्हे रेड झोनमध्ये, कडक लॉकडाऊन गरजेचा : विजय वडेट्टीवार

Archana Banage

इंजिनियर मारहाण प्रकरण: ‘CCTV फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

Archana Banage
error: Content is protected !!