Tarun Bharat

‘स्वाभिमानी’चे 4 मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम

प्रतिनिधी / कोल्हापूर

महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस तरीदेखील महा विकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या चार मार्चपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

तर लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कामात सहभागी होऊ देणार नाही असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दूरध्वनीवरून माझ्याशी संपर्क केला आणि याच प्रश्नावरून चर्चेसाठी यावे असे आमंत्रण दिले आहे. मात्र आंदोलन सुरू ठेवूनच चर्चेला येईल असं ऊर्जा मंत्र्यांना सांगितले असल्याचे सांगण्यात आले

Related Stories

महाव्यवस्थापकांचा दौरा ‘बुलेट ट्रेन’पेक्षा फास्ट!

Archana Banage

सोशल मिडियावर बदनामी करणाऱया पत्नीविरुध्द तक्रार

Patil_p

रेवंडे घाटात कोसळली दरड , रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प

Archana Banage

जोतिबा दर्शनासाठी भाविकांना यातनाच; निर्बंध उठले तरी नियोजनाअभावी गैरसोय

Abhijeet Khandekar

Rahul Shewale : आम्ही गट नाही, आम्ही शिवसेनाच आहोत,राऊतांचा गैरसमज झालायं

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : नवरात्रोत्सवातही मंदिरातील देवतांचे दर्शन नाहीच

Archana Banage
error: Content is protected !!