Tarun Bharat

स्वाभिमानीचे गांधी जयंतीला सत्याग्रह आंदोलन

प्रतिनिधी / सातारा :

शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्याकरीता महात्मा गांधी जयंती दिवशी एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील शेतकरी व सामान्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच कोरोना महामारीच्या संकटातून हातचा रोजगार गेला, उद्योग व्यवसायांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेती क्षेत्राची नासधूस होऊन शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परीस्थितीत सरकारने भक्कम पाठिंबा देण्याऐवजी सरकार सर्व शेतकरी व सामान्यांना उध्वस्त करणारे निर्णय घेण्याचे कट कारस्थान करत आहे. या सर्व बाबींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी व संपूर्ण संघटना गेली बरीच दिवस सातत्याने भांडत आहेत. आंदोलने मोर्चे काढून न्याय मागत आहेत. तरीही शासन दखल घेत नाही. उलट केंद्रात व राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असल्याने ऐकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे वारंवार दिसून आले आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधातील निर्णय घेताना सर्वजण एक होतात व तसे निर्णय प्रस्तावित करतात यांचे दुःख आहे. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळवण्याकामी आम्ही सर्व शेतकरी व सामान्यांना घेऊन गांधी जयंती दिवशी (दि.2) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने सत्याग्रह आंदोलन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करणार आहोत, असे नमूद केले आहे.

Related Stories

मंडईतील 17 दुकानगाळे सील

Patil_p

वनविभागाच्या भरारी पथकाचा आंबेदरेत छापा

Patil_p

चार भिंती रोडची उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी करुन घेतली स्वच्छता

Omkar B

सातारा : … अन् पालिकेने स्वच्छ केली ‘ती’ कचराकुंडी

datta jadhav

फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरडय़ांना बाधा

Patil_p

प्रवीण दरेकर, केदारनाथ धाम देवालयाचे लोकार्पण

Patil_p