Tarun Bharat

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिली दुधाची बाटली भेट


सातारा / प्रतिनिधी :

दूध दराच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दूध आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना दुधाची बाटली भेट दिली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर दूध आंदोलन सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व दूध संस्था, दूध संकलन केंद्रे, शेतकरी यांनी विनंती केल्यानुसार 100 टक्के दूध बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळत आहे.दूध दरवाढ होऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यामार्फत केलल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ आदी उपस्थित होते.

Related Stories

पुण्यात मनसेला खिंडार; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

datta jadhav

सातारा : आज 181 नागरिक झाले कोरोनामुक्त तर 57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

नाना पटोलेंच्या आरोपांनंतर संजय राऊत म्हणाले…

Tousif Mujawar

चुकीच्या निविदांमुळे घरकुल योजना वादात

Patil_p

जिल्हय़ात अवकाळीने उडाली दैना

Patil_p

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजेंसह वेदांतिकाराजेंनी घेतली कोरोना लस

datta jadhav