Tarun Bharat

स्वित्झर्लंडमध्येही आता बुरखाबंदी

Advertisements

बर्न / वृत्तसंस्था

स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरखा घालून आपला चेहरा लपवता येणार नाही. देशात राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये 51 टक्के नागरिकांनी बुरखा आणि हिजाब सार्वजनिक ठिकाणी घालू नये या बाजूने मत दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील सरकारने तयार केलेल्या सात सदस्यांचा सहभाग असणाऱया कार्यकारी परिषदेने जनमत चाचणीमधील मतदानाला विरोध करत बंदीचा निर्णय अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम आणि ऑस्ट्रियामध्येही अशाप्रकारची बंदी घालण्यात आली आहे.

जनमत चाचणीनंतर घेण्यात आलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयामुळे आता स्वित्झर्लंडमध्ये रेस्टॉरंट, खेळाची मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणी मुस्लीम महिलांना हिजाब आणि बुरख्यामध्ये स्वतःचा चेहरा झाकून फिरता येणार नाही. मागील बऱयाच काळापासून स्वित्झर्लंडमध्ये मुस्लीम महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब घालण्याची परवानगी देण्यात यावी की नाही हा वादाचा मुद्दा ठरत होता. त्यामुळेच जनतेला काय वाटते हे आजमावण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली. देशात 7 मार्च रोजी जनमत चाचणी पार पडली. या जनमत चाचणीला स्वित्झर्लंडमधील सर्व धार्मिक गटांचे नेतृत्व करणाऱया संस्थेनेही विरोध केला होता.

Related Stories

महागाई भत्त्याऐवजी बुलेट ट्रेन थांबवा !

Patil_p

भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचला

datta jadhav

अयोध्या : राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न

datta jadhav

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाची चिन्हे

Patil_p

देशात पावणेतीन कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात

datta jadhav

किरकोळ वाहन विक्री मे मध्ये वाढली

Patil_p
error: Content is protected !!