Tarun Bharat

स्व.मनोहर पर्रीकर यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपतींच्या हस्ते चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी स्वीकारला पुरस्कार

प्रतिनिधी /पणजी

भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्याकडे हा पुरस्कार सुपूर्द केला. गोव्यासाठी हा अत्यंत स्वाभिमानाचा दिवस ठरला, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच केंदीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सोमवारी एका समारंभात सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे दोन नेते उपस्थित होते. स्व. मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात या पुरस्काराचे वितरण झाले नव्हते ते सोमवारी करण्यात आले.

पर्रीकरांमुळे गोव्याने गगनभरारी मारली : मुख्यमंत्री

या पुरस्कार वितरणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरदृष्टिकोन असलेला मनोहर पर्रीकर हा नेता केवळ गोमंतकीयांच्याच नव्हे तर साऱया देशाच्या हितासाठी आपले योगदान देऊन गेला. त्यांच्या दूरदृष्टिकोनाच्या आणि त्यागीवृत्तीच्या सेवेतून गोव्याने विकास क्षेत्रात गगनभरारी मारली. संरक्षणमंत्री असताना देखील अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

गोमंतकीयांची मान अभिमानाने ताठ करणारा क्षण : श्रीपाद नाईक

भारताचे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर प्रति÷sचा असा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांनी हा पुरस्कार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकारला. प्रत्येक गोमंतकीयांची अभिमानाने मान ताठ करणारा हा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आणि पर्रीकरांच्या असंख्य चाहत्यांचा उत्साह वाढविणारी ही आनंददायी घटना आहे, असे पुढे नाईक म्हणाले.

हा पर्रावासियांचा सन्मान : लोबो

देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना प्राप्त झालेला  पद्मभूषण सन्मान हा तमाम गोमंतकीय आणि पर्रा गांवच्या लोकांचा सन्मान असल्याचे कळंगुटचे आमदार तथा राज्याचे मंत्री मायकल लोबो यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. बार्देश तालुक्मयातील पर्रा गावात जन्मलेल्या मनोहरभाईंनी दिल्लीच्या तख्तापर्यत उडी घेत  देशाच्या संरक्षणमंत्रीपदापर्यत मजल मारण्याचे कौतुकास्पद कार्य केले होते. त्यांच्या कार्यकाळात घडून आलेल्या पाकिस्तान विरोधातील यशस्वी सर्जिकल स्ट्राईक देशातील जनता कदापि विसरणार नाही, असेही मंत्री लोबो यांनी यावेळी सांगितले. 

विनायक खेडेकर यांना पद्मश्री प्रदान दरम्यान, गोमंतकाच्या लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व विनायक खेडेकर यांनाही सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. खेडेकर यांनी लोकसाहित्य क्षेत्रात अखंडपणे सेवा बजावली आहे.

Related Stories

पालये येथे घर फोडून सोन्याचे दागिने चोरी केल्या प्रकरणी दोघांना पकडले

Amit Kulkarni

फोंडा नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांचा राजीनामा

Amit Kulkarni

काजूला रु 125 आधारभूत किंमत द्यावी

Omkar B

भारतीय मल्लखांब महासंघाच्या अध्यक्षपदी दुर्गेश गावकर

Amit Kulkarni

ओबीसींच्या समस्या सोडवण्यासाठी आपण व सरकार गांभीर

Amit Kulkarni

नियोजनबद्ध प्लंबिंग कला युवकांसाठी रोजगारांची दारे उघडणार-मंत्री गोविंद गावडे

Amit Kulkarni