Tarun Bharat

हंता विषाणूने वाढवली चिंता

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :  

कोरोनातून सावरणाऱ्या अमेरिकेत आता आणखी एका विषाणूने डोके वर काढले आहे. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एका महिलेला हंता विषाणूची लागण झाली आहे. तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिशिगनमधील आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.  

उंदरांची लाळ, लघवी आणि मल यांच्यामुळे हंता विषाणूची लागण होते. कोरोना काळात या विषाणूची लागण झालेली अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. मिशिगनच्या वाशटेनॉ काऊंटीमध्ये एक महिला दोन वर्षांपासून बंद असलेल्या एका घराची साफसफाई करत होती. त्याचवेळी ती उंदरांच्या संपर्कात आली होती. या महिलेला आता हंता विषाणूची लागण झाली आहे.     

हा विषाणू माणसापासून माणसांमध्ये पसरत नसला तरीही या विषाणूने संक्रमित 40 टक्के लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. अमेरिकेत 1993 पासून हंता विषाणूबद्दल संशोधन सुरू आहे.

Related Stories

3922 पायऱया असणारी स्वर्गाची शिडी

Patil_p

अमेरिकेच्या अध्यक्षांची बंदुक नियंत्रण विधेयकावर स्वाक्षरी

Patil_p

रशियात लढाऊ विमान कोसळले, 13 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

ऍडीबॉडी उपचार पद्धतीने होतोय लाभ

Patil_p

बायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी

datta jadhav

अमेरिकेत 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!