Tarun Bharat

हंसल मेहता यांच्या चित्रपटात करिना

Advertisements

डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर अलिकडेच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला नसला तरीही करिनाने स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. करिना आता स्वतःच्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती देखील तीच करणार आहे. हंसल मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हंसल मेहता यांचा हा चित्रपट क्राइम थ्रिलर धाटणीचा आहे. परंतु याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटात करिना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारत आहे. याचबरोबर तिची ही भूमिका ग्लॅमरस तसेच बोल्ड असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लंडनमध्ये याचे चित्रिकरण सुरू होईल.

करिना याचबरोबर सुजॉय घोषच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबत झळकणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. करिना या चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Related Stories

न्यू नॉर्मल आव्हानात्मक : श्रेया बुगडे

Patil_p

क्रांतिवीर राजगुरूंचे आयुष्य वेबसिरीजमध्ये

Patil_p

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर!

Tousif Mujawar

पृथ्वीराज’मध्ये ऐतिहासिक भूमिकेत अक्षय

Patil_p

500 कोटींच्या चित्रपटात दीपिका पदूकोन

Patil_p

सारेगमपची 25 वर्षे होणार साजरी

Patil_p
error: Content is protected !!