Tarun Bharat

हज यात्रेसाठी अर्ज केलेल्यांना मिळणार पूर्ण पैसे परत

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेसाठी परदेशी मुस्लिम नागरिकांसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या यात्रेसाठी भारतातून अर्ज केलेल्या मुस्लिम बांधवांना केंद्र सरकार पूर्ण पैसे परत करणार आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सौदी अरेबियाच्या हज आणि उमरा विषयक मंत्रालयाने हज यात्रेसाठी परदेशी नागरिकांना परवानगी नाकारली आहे. केवळ सौदीतील नागरिकांनाच अटी शर्थींसह परवानगी  देण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या या घोषणेनंतर मोदी सरकारने या यात्रेसाठी भारतातून अर्ज केलेल्या मुस्लिम बांधवांना पूर्ण पैसे परत करणार असल्याचे सांगितले.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हज यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी जे लोक येतील, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे. 

Related Stories

सर्वात भीतीदायक घरांपैकी एक

Patil_p

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav

पहाडावर चढणारी बंद कार

Patil_p

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीनं बजावले पुन्हा समन्स!

Archana Banage

पाक सरकार खरेदी करणार ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घरे

datta jadhav

”स्वामीनिष्ठेसाठी बलात्कारासारख्या विषयाचे भांडवल करणं निंदनीय”

Archana Banage
error: Content is protected !!