Tarun Bharat

हडफडे-नागोवा सरपंचपदी श्रीकृष्ण नागवेकर

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

हडफडे नागवा पंचायतीच्या सरपंचपदी श्रीकृष्ण नागवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करारानुसार राजेश मोरजकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार या पदी नागवेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

राजेश मोरजकर यांनी नाव सुचविले तर व्हिवोलेंटा डिसोझा यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी पंच दिपीका रेडकर, विद्याधर दिवकर, सखाराम नाईक उपस्थित होते. पंच सलीन सय्यद अनुपस्थित होते. हडफडे गावात जी कामे बाकी आहेत ती स्थानिक मंत्री मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाकडे नेऊ असे ते म्हणाले. मावळते सरपंच राजेश मोरजकर यांनी अभिनंदन केले.

Related Stories

साहित्य माणसाला जगण्याची नवीन दिशा दाखवू शकते

Patil_p

मंगळसूत्र हिसकावणाऱया संशयित चोरटय़ाचे रेखाचित्र जारी

Patil_p

गोव्यातील युवकांनी कृषी क्षेत्राकडे वळावे

Omkar B

सासष्टी दर वर्षी किमान दीड हजार जण पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारतात

Patil_p

चोडण साऊद येथे उद्या सांज्याव

Amit Kulkarni

तरुणजीत तेजपालला उच्च न्यायालयाची नोटीस

Patil_p
error: Content is protected !!