Tarun Bharat

हत्ती संशोधक-संरक्षक अजय देसाई यांचे निधन

बेळगाव / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हत्ती संशोधक आणि संरक्षक अजय देसाई यांचे शुक्रवारी वयाच्या 62 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यांचे शालेय शिक्षण बेळगाव-कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलमध्ये झाले होते.

मूळचे बेळगावचे रहिवासी असलेले अजय देसाई हे देशातील मातब्बर हत्ती तज्ञांपैकी एक होते. गेल्या 38 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे वन्यजीव अभ्यासक-व्यवस्थापक अशी ख्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली होती.   हत्तींचा गाढा अभ्यास व संशोधनामुळे त्यांची ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर’ या विशेष समितीवरही झाली होती. भारत सरकारच्या हत्ती संरक्षण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटकसह तामिळनाडू, केरळ, आसाम, ओडिशा या राज्यांमध्ये वनविभाग आणि गावकरी यांच्यासोबत अविरतपणे प्रयत्न केले. भारतासह श्रीलंका थायलंड म्यानमार नेपाळ बांगलादेश या  देशातही हत्तींच्या संवर्धनासाठी काम केले. जंगली हत्तीचा प्रगल्भ अभ्यास, गावकऱयांशी जवळचे संबंध, दुर्गम वन क्षेत्रातील कर्मचाऱयांशी संपर्क, वनविभाग-राज्य सरकार-केंद्र सरकार या सर्वांशी एकत्र येऊन शास्त्रीय माहितीच्या आधारावर त्यांनी अनेक अहवालही त्यांनी मांडले आहेत.

Related Stories

सोगल येथील धबधबा प्रवाहित

Amit Kulkarni

चित्रपटांप्रमाणे स्टंट करणारा सिद्धार्थ

Amit Kulkarni

कॅम्पमधील वाल्मिकी मंदिर हस्तांतर करण्यासाठी नोटीस

Patil_p

रूद्राक्ष प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

Amit Kulkarni

बालचमूंना किल्ले साकारण्याचे वेध

Amit Kulkarni

परिवहनच्या तिकीट बुकिंगला अल्पप्रतिसाद

Patil_p