Tarun Bharat

हद्दवाढीत समावेश झाल्याने आकाशवाणी येथे आनंदोत्सव

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराच्या हद्दवाढीमध्ये त्रिशंकू भागातील आकाशवाणी झोपडपट्टीचा समावेश झाला. हद्दवाढ मंजूर करुन त्रिशंकू भागाला विकासाची कवाडे खुली करुन दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे अभिनंदन करत आकाशवाणी येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रलंबीत प्रश्न सोडवून आ. शिवेंद्रराजे यांनी शहरासह त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग खुला केला. आकाशवाणी झोपडपट्टी हा भाग सुध्दा त्रिशंकूमध्ये मोडत होता. मात्र आता हा भाग हद्दवाढीत समाविष्ट असल्याने पालिकेच्या अखत्यारीत येणार आहे. त्यामुळे आमच्याही भागात विकासकामे होतील. याबद्दल सर्व नागरिकांच्यावतीने आ. शिवेंद्रराजे यांचे आभार मानतो, असे आकाशवाणी झोपडपट्टी येथील सचिन कांबळे यांनी म्हटले आणि आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सचिन कांबळे यांच्यासह रविंद्र बाबर, अस्लम शेख, अमोल जानराव, अश्विन भिसे, रविंद्र शेडगे, अनिल पिसाळ, बापू भोरे, मिलींद कांबळे, नागेश पडवळ, शोभा बाबर, सुजाता भोरे, रेखा पिसाळ, सुप्रिया जानराव, शितल बाबर, ममता पवार, अर्चना कांबळे, सुनिता शेडगे यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Related Stories

सातारा : खा.उदयनराजे घेणार मराठा नेत्यांची बैठक

datta jadhav

३८ हजारांची मोहन माळ अज्ञात चोरट्या महिलेने लांबवली

Archana Banage

सांगली : नुकसान भरपाईचे विषय ‘सुपारी’ घेऊन

Archana Banage

दोन मुलांचा खून करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

जळगाव वसतिगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

Tousif Mujawar

रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल यांना 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी

Tousif Mujawar
error: Content is protected !!