Tarun Bharat

हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्यात अडचण

एकत्रित विकास नियंत्रणच्या तरतुदी लागू करण्याबाबत उदयनराजेंचे मंत्री शिंदेंना निवेदन

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्रात बहुतांशी नागरी वसाहती आहेत. हद्दवाढीत समाविष्ट झाल्याने या भागातील बांधकामांबाबत परवानगी, बांधकामे नियमित करुन घेणे इत्यादी करीता अनेक प्रस्ताव नगरपरिषदेच्या स्तरावर प्रलंबित आहे. सध्या वाढीव क्षेत्रामध्ये नगरपरिषदेची विकास योजना मंजूर नाही. प्रारुप किंवा मंजूर विकास योजना नसेल तर अशा भागाकरीता सातारा प्रादेशिक योजनातील तरतुदी लागु होतील अशी तरतुद आहे. मिळकतधारकांचे दुहेरी नुकसान होवू नये म्हणून हद्दवाढ क्षेत्राकरीता एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नगरपरिषदेसाठीच्या तरतुदी लागु करण्याबाबत, नगरविकास खात्याकडून निश्चित आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी एका निवेदनाव्दारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

उदयनराजे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे नमुद केले आहे की, हद्दवाढ झालेल्या परिसरामध्ये नगरपरिषदेची विकास योजना मंजूर नाही. तसेच हद्दवाढ भागातील प्रारुप विकास योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यास वर्षभर लागणार आहे. हद्दवाढ भागात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे होत आहेत, झालेली आहेत. सदरची झालेली बांधकामे नियमित करणे किंवा नवीन बांधकामांना परवानगी देताना, नगरपरिषदेच्या मंजूर विकास योजनेत हा भाग नसल्याने, नियमावली कोणती वापरावयाची असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश होवून सुध्दा इतर सर्व शासकीय कर वगैरे नगरपरिषदेसाठीच्या दराने भरावे लागुनही एकाच प्रकारच्या क्षेत्राकरीता वेगवेगळया तरतुदी लागु होतात ही असमानता निर्माण होत आहे.

यावर उपाययोजना म्हणून एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन  नियमावलीतील नगरपरिषदेसाठीच्या तरतुदी लागु हद्दवाढ झालेल्या भागाकरीता करण्याकामी आपल्या मंत्रालयीन स्तरावरुन योग्य ते आदेश पारित व्हावेत अशी विनंती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Related Stories

बार्शीत जिल्हाधिकारी यांचा घरपोच गॅसचा आदेश वाऱ्यावर

Abhijeet Shinde

कराडजवळ महामार्गावर बिबट्या अवतरला

datta jadhav

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

Rohan_P

माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 103 उमेदवारी अर्ज

datta jadhav

सातारा : डायलिसिस अभावी गोडोलीतल्या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

नागठाणे परिसरातील गावांमध्ये डेंग्यूची साथ

datta jadhav
error: Content is protected !!