Tarun Bharat

हद्दवाढ झाली अन् कोरोनातही जागेचे भाव वाढण्याची शक्यता

शाहूपुरी,खेड, शाहूनगरमध्ये 25 लाख गुंठा : महादरे परिसरात 15 लाख गुंठा : सध्या रेडी रेकनरनुसार 1 टक्का दरवाढ

प्रतिनिधी / सातारा

 नुकतीच सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे.उपनगरातल्या मुख्य ठिकाणच्या जागा अगोदरच गगनाला भिडल्या आहेत.त्यात आता हद्दवाढ झाल्याने तब्बल दहा टक्क्यांपर्यंत जागेचे भाव वाढले जाण्याची शक्यता आहे.सध्या शाहुपुरी, शाहूनगर आणि खेडचा मोक्याच्या जागेचे भाग 20 ते 25 लाख रुपये गुंठा आहेत.महादरे परिसरात 12 ते15 लाख गुंठा आहेत.मात्र, जेव्हा हद्दवाढीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा उपनगरातल्या जागेला सोन्याचा भाव येणार आहे.रेडी रेकनर एक टक्का वाढला आहे.तेवढाच दर वाढला आहे.

सातारा शहर हे पेन्शनरांचे शहर ओळखले जाते.सदर बाजार, व्यकंटपुरा पेठेत आज फिरले असता सेवा निवृत्त झालेलेच रहिवासी पहायला मिळतील. कोरेगाव पार्क सारखा एखादाच व्यापायांच्या रहिवाशी असलेले ठिकाण पहायला मिळते.शहरातले काही ठिकाणी अजून ही दर कमी आहेत.त्यामध्ये मंगळवार पेठेतल्या समर्थ मंदिर परिसर, माची पेठेतला काही भाग, मल्हार पेठेतला काही भाग, बुधवार पेठेतल्या काही भाग, करंजे पेठेतला काही भाग या ठिकाणचे जागेचे दर कमी आहेत. मात्र या ठिकाणच्या मोक्याच्या जागा मात्र चांगलेच दर आहेत.शहरालगत असलेला व नुकताच शहरात आलेला शाहूपुरी, शाहूनगर, महादरे,खेड, पिरवाडी या परिसरात सध्या जागेचे भाव पहाता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत.दिव्यनगरीत 18 लाख गुंठा, शाहुपुरी चौकात 20 ते 25 लाख गुंठा, समाधीचा माळ परिसरात 12 ते 15 लाख गुंठा, महादरे गावात 15 ते 18 लाख गुंठा, शाहुनगरमध्ये 20 ते 25 लाख रुपये गुंठा असे दर आहेत.खेड,पिरवाडीत अगोदरच दर गगनाला आहेत. आता तर हद्दवाढ झाली आहे.हद्दवाढीची प्रक्रिया सूरु झाल्यानंतर प्रत्यक्ष पालिका काय काय सुविधा देते त्यावर दर किमान पाच ते दहा टक्के वाढण्याची शक्यता आहे.

मार्केट थंड आहे

हद्दवाढ झाली असली तरीही अजून प्रक्रिया कोणतीही झाली नाही. त्यामुळे जुन्याच दराने खरेदी विक्री सुरू आहे.सध्या मार्केट शांत आहे.कोरोनामुळे उलाढाल ठप्प आहे.

सयाजी चव्हाण मातोश्री बिल्डर

दर वाढले जाण्याची शक्यता

हद्दवाढ झाल्याने जेव्हा प्रत्यक्ष हद्दवाढीची कार्यवाही सुरू होईल, पालिका नेमके काय काय सुविधा देणार, त्या कशा असणार यावर दर वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या रेडी रेकनर नुसार दर आहेत.

अमर बेंद्रे बिल्डर

Related Stories

सातारा : महामार्गावर बेलेवडे हवेली जवळ ऊस वाहतूक ट्रक्टर पेटला

Archana Banage

म्हसवड- वरकुटे रस्ता दुपदरीकरणाचे मंजूर काम सुरु करण्याची मागणी

Patil_p

राज्यातील विजेचा, सिंचनाचा प्रश्न सुटला

Patil_p

सातारा : एकीव शाळेतील संगणकासह अन्य साहित्याची चोरी

Archana Banage

मराठमोळा मल्ल राहुल आवारे यांची जागतिक कुस्ती चषक स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

भूकंपाच्या दोन धक्क्यांनी पाटण तालुका हादरला

Patil_p