Tarun Bharat

हनिमूनसाठी सायकलने निघाले दांपत्य

एक महिन्यात 2 हजार किमीचा प्रवास पूर्ण

पंजाबच्या तरुण जोडप्याने विवाहाच्या दोन वर्षांनी हनिमूनसाठी उचललेले पाऊल आताच्या तरुणाईला प्रभावित करत आहे. लेखक पतीने स्वतःच्या गायिका पत्नीला साथ देत पूर्ण देश फिरण्याचा निर्धार केला. या दांपत्याने एक महिन्यात 2 हजार किमीचा प्रवास केला आहे.

पंजाबच्या नवा शहर जिल्हय़ातील कुलथम गावाचे रहिवासी असलेले 32 वर्षीय अमरतपाल सिंह आणि त्यांच्या पत्नी अमनजौत कौर यांचा 20 जानेवारी 2020 मध्ये विवाह झाला होता. पतीने विवाहानंतर कुठेच फिरायला न नेल्याने पत्नीने हट्ट धरला. मग पतीने पूर्ण देश हिंडविणार, पण सायकलने जावे लागेल असे सांगितले. पत्नीने देखील थट्टेच्या सूरात चालेल असे उत्तर दिले. अमरपालने सायकल खरेदी करून आणल्यावर दोघ्ढोही 15 डिसेंबर 2021 रोजी प्रवासास निघाले.

देशाची संस्कृती जाणून घेण्यासाठी हे दांपत्य घराबाहेर पडले आहेत. दोघांनीही घरातूनच भोजन तयार करण्याचे साहित्य सोबत घेतले आहे. दोघेही पंजाबमधून गंगानगर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर असा आतापर्यंत प्रवास केला आहे. थट्टेतून आमचा देशभ्रमंतीचा प्रवास सुरू झाल्याचे अमरतपाल सिंह सांगतो. लोकांना भेटून तेथील संस्कृती स्वतःच्या मोबाइलमध्ये कैद करत त्याला किंग अँड क्वीन या युटय़ूब चॅनेलवर ते अपलोड करत आहेत. पूर्ण देश हिंडण्यास एक वर्ष लागले तरीही बेहत्तर असे अमनजोतने म्हटले आहे.

महिन्याच्या प्रवासात 2,500 रुपयांचा खर्च

घरातून बाहेर पडल्यावर आता महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. आतापर्यंत 2500 रुपये खर्च झाले आहेत. यातील 1500 रुपये सायकलवर खर्च झाले. वाटेत लोकच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत असल्याने खर्च कमी होतो असे अमरतपाल सांगतो. त्याने लिहिलेली गाणी प्रसिद्ध झाली आहेत.

Related Stories

दुबई : भारतीय चालकांना 41 कोटी रुपयांची लॉटरी

Patil_p

‘आप’च्या 1,300 कोटीच्या घोटाळय़ाची चौकशी होणार

Patil_p

देशात चोवीस तासात 1.94 लाख नवे रुग्ण

Patil_p

“आम्ही पळत नव्हतो, इशारा न देताच सर्व बाजूंनी गोळीबार…”; पीडित व्यक्तीने अमित शाहांचा दावा फेटाळला

Archana Banage

हर्षवर्धन श्रृंगला नवे विदेश सचिव

Patil_p

न्यायाधीशाच्या चौकशीची सीबीआयला अनुमती

Patil_p