Tarun Bharat

हनीट्रपप्रकरणी सातारा जिल्हय़ातील चौघे जेरबंद

Advertisements

बारामती पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

महिलांच्या मदतीने व्हॉटसऍपवर मेसेज पाठवून हनीट्रपमध्ये अडकवून पैसे लुबाडणाऱया सातारा जिल्हय़ातील चौघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली. यात मुंबई पोलीस दलातील एका बडतर्फ पोलिसासह दोन महिलांचा समावेश असून विशेष म्हणजे महिला दिनी महिला पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. 

बारामतीतील कमला शंकर पांडे (रा. अशोकनगर, जैन मंदीरासमोर, मयुरेश्वर अपार्टमेंट, बारामती) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी स्मिता दिलीप गायकवाड (रा. फलटण, जि. सातारा), मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलीस कर्मचारी आशिष अशोक पवार (रा. भुईंज, ता. वाई), सुहासिनी योगेश अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) आणि राकेश रमेश निंबोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि.सातारा) या चौघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

नामदेव शिंदे यांनी सांगितले की, आशिष पवार हा बडतर्फ पोलिस या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. सावज हेरून स्मिता गायकवाड हिच्या मोबाईलवरुन ओळख निर्माण करुन त्यांना फलटणला बोलावून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे धमकावून त्यांच्याकडून पैसे लुटणे अशी यांची कार्यपध्दती होती. कमला पांडे यांच्याकडूनही त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती, मात्र त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अश्विनी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. या सापळ्यात हे चौघेही अलगद सापडले.

यातील राकेश निंबोरे याच्यावर या पूर्वी खंडणी, दरोडा, पोलिसांवर हल्ला करणे, अपहरण असे अकरा गुन्हे दाखल असून तो आपले नाव गुरु काकडे असे सांगायचा. बारामती बसस्थानकावर वीस हजारांची खंडणी स्विकारताना पोलिसांनी राकेश निंबोरे याला ताब्यात घेतल्यानंतर इतर तिघांची नावे चौकशीत निष्पन्न झाली. त्या नंतर त्या तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस कर्मचारी सागर देशमाने, अतुल जाधव, अंकुश दळवी, अजित राऊत, दशरथ इंगुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अशा काही प्रकरणात कोणाची फसवणूक झाली असल्यास न घाबरता लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. पोलीस त्यात कारवाई करतील, असे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आवाहन केले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 3442 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Rohan_P

सातारा : …अखेर बंटी जाधव गजाआड

datta jadhav

सलग तिसऱया दिवशी हजारावर रूग्णांची नोंद

Patil_p

कोल्हापूर : पुढील विधानसभा स्वतंत्रपणे लढवून दाखवा

Abhijeet Shinde

शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने आनंदीआनंद

datta jadhav

विलगीकरण कक्ष नसल्यानेच शहरात कोरोना वाढतोय

Patil_p
error: Content is protected !!