एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
हनुमाननगर येथील हनुमान मंदिरात पावणे चार लाखांची चोरी झाली आहे. चोरटय़ांनी गेल्या काही महिन्यांपासून मंदिरे लक्ष्य बनविली असून गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. चोरटय़ांनी 10 किलो चांदी व दोन किलो पितळी साहित्य पळविल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. 8 किलो चांदीची प्रभावळ, दीड किलो चांदीची उत्सव मूर्ती, दोन किलो पितळी गदा असा एकूण 3 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.